Wednesday, December 25, 2024
Homeगुन्हेगारीराजेशाही थाट दाखवून मुलींना जाळ्यात अडकविणारा स्वतःच जाळ्यात अडकला...

राजेशाही थाट दाखवून मुलींना जाळ्यात अडकविणारा स्वतःच जाळ्यात अडकला…

न्यूज डेस्क – आपल्या भारतात Tiktok बंद झाले तेव्हा पासून बरेच Tiktok स्टार बेरोजगार झालेत, तर अनेकांच भविष्य या अप्स ने बनविले. तर काही स्टार झालेले यातून काम धंदा नसल्याने गुन्हेगारी कडेही वळले. असाच एक प्रकार समोर आला आहे. स्वत:ला राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचं भासवून एक दोन नव्हे तर तब्बल 50 महिलांची फसवणूक करणाऱ्या टिकटॉक स्टारला पोलिसांनी अटक केली आहे.

राजवीर सिंग देवासी असं या टिकटॉक स्टारचं नाव आहे. तो 25 वर्षाचा असून मूळचा राजस्थानचा आहे. तो महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अनोखी पद्धत वापरत होता. तो इन्स्टाग्रामवर राजस्थानी राजवाड्यांमधील स्वत:चे शेकडो फोटो पोस्ट करत होता. त्यानंतर तो तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. राजघराण्यातील व्यक्ती म्हणून अनेत तरुणी त्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायच्या. त्यानंतर तो या तरुणींशी मैत्री हळूहळू संवाद वाढल्यावर तुझ्या प्रेमात पडल्याचं तो तरुणींना सांगायचा. तरुणींचा होकार आल्यानंतर काही दिवस तो तरुणींसोबत प्रेमाचं नाटक करायचा. त्यानंतर या तरुणींना त्यांचे खासगी फोटो पाठवण्यास सांगायचा. या फोटोंचा तो नंतर खंडणीसाठी वापर करायचा.

तरुणी आणि महिलांनी वैयक्तिक फोटो पाठवल्यानंतर हे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. काही तरुणी आणि महिला बदनामी होऊ नये म्हणून त्याच्या धमकीला बळी पडल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.

गोरेगाव येथे राहणारी एक 30 वर्षीय विवाहित महिला देवासीच्या जाळ्यात सापडली होती. तिलाही देवासीने पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने या महिलेने त्याला चार लाखाहून अधिक रक्कम दिली. पण तो या महिलेला वारंवार पैसे मागत असल्याने अखेर या महिलेने गोरेगाव पोलिसात धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी देवासीला मंगळवारी रात्री आरे कॉलनीतून अटक केली. त्याच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भादंविचे इतर कलमंही त्याच्यावर लावण्यात आली आहेत. तसेच आयटी कायद्याखालीही त्याला अटक केली आहे. आरोपी हा मूळचा राजस्थानचा असून त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट चकाकणारे राजवाडे, आलिशान वाहने आणि सुरक्षा रक्षकांच्या छायाचित्रांनी भरलेले आहे. त्याने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीही टिकटॉक स्टार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: