Sunday, December 22, 2024
Homeराज्यजुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा आंदोलन...

जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा आंदोलन…

पदवीधर युवाशक्ती असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला – शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पदवीधर युवाशक्ती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शरद झांबरे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

संपूर्ण देशभरामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड यासारख्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. या राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे. तरीही महाराष्ट्रात मात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अद्याप लागू करण्यात आलेली नाही.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी, अशी मागणी शरद झांबरे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाकडे केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: