Saturday, November 23, 2024
Homeराज्यअमरावतीत उद्योजकता विकास परिषदच्या कार्यालयाचे उद्घाटन किरणभाऊ पातूरकर यांच्या हस्ते संपन्न…

अमरावतीत उद्योजकता विकास परिषदच्या कार्यालयाचे उद्घाटन किरणभाऊ पातूरकर यांच्या हस्ते संपन्न…

महापरिवर्तनम फाऊंडेशनचा उपक्रम, स्वयंसिध्द उद्योजकता विकास अभियान, सहयोगी संस्था अमरावती येथे दि- 2/3/2023 रोजी रुकमनी नगर मध्ये उद्योग विकास परिषद येचे ऑफिस चे उ्घाटन करण्यात आले.

देशात नव्याने उद्योजक घडावे, त्यांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना प्रेरणा, मार्गदर्शन मिळावे यासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आंतरराष्ट्रीय प्रख्यात वक्ते सोनू शर्मा यांचे व्याख्यान आणि तीन दिवसीय बिजनेस एक्स्पो दि.०२/०३/२०२३ रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन करण्यात आले. महापरिवर्तनम फाऊंडेशन औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून होतकरू नवउद्योजकांना त्यांचे प्रस्ताव तयार करणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन आणि विविध संस्थांना माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सीईओ चंद्रकांत इंगळे हे तरूण, कल्पक उद्योजक आहेत. भारतातील नवउद्योजकांना उद्योजक घडवू, उद्योजक बनवू या उद्देशाने तरूण उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रख्यात वक्ते सोनू शर्मा यांना अमरावती येथे आमंत्रित केले आहे.

आंतरराष्ट्रीय वक्ते सोनू शर्मा यांच्या हस्ते बिजनेस एक्स्पो चे उद्घाटन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणभाऊ पातूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत इंगळे व जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी निमंत्रीत राहतील. बिजनेस एक्स्पो दि. 19, 20 आणि 21 मार्च 2023 ला आर्ट गॅलरी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात येणार.

Entrepreneurship Development Council

महापरिवर्तनम फाऊंडेशन व सोबतच स्वयंसिध्द उद्योजकता विकास अभियान सहयोगी संस्था म्हणून असेल. मा.किरणभाऊ पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजिका प्रा. मोनिकाताई उमक सातत्याने उद्योजकीय कार्यक्रम राबवित आहेत.

यांनी यशस्वीरित्या सुमारे 700 उद्योजकांना आपले उद्योग सुरू करून दिले आहेत. त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम स्वयंसिध्द करीत आहे. आंतरराष्ट्रीय प्रख्यात वक्ते वक्ते सोनु शर्मा हे देशभरातील मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला प्रेरणा देत असतात. प्रथमच उद्योजकता विकास परिषदे साठी सोनू शर्मा अमरावती विभागात येणार असून त्यांचे हस्ते काही विशिष्ठ उद्योजकांना पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत. कार्यक्रम सोनू शर्मा यांचे व्याख्यान चे तिकीट bookmyshow या ऑनलाईन अप्लीकेशन वर उपलब्ध राहतील.

बिझनेस एक्स्पो मध्ये आपले उत्पादन स्टॉल साठी संपर्क साधावा असे आवाहन महापरिवर्तनम फाऊंडेशन चे संस्थापक संचालक चंद्रकांत इंगळे, स्वयंसिध्द चे किरण पातूरकर, प्रा. मोनिकाताई उमक यांनी केले आहे. अशी माहीत आज दि. ०२/०३/२०२३ रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: