Saturday, December 21, 2024
Homeराज्यतुषार पुंडकर खून खटल्या ची पुढील सुनावणी २ जानेवारी २०२५ रोजी…

तुषार पुंडकर खून खटल्या ची पुढील सुनावणी २ जानेवारी २०२५ रोजी…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील बहुचर्चित तुषार फुंडकर खून खटल्या संदर्भात आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात घटनास्थळ पंचांचे साक्षी पुरावे नोंदविणे सुरू असून आज रोजी एका पंचाची साक्ष पूर्ण झाली आहे. तर उर्वरित पंचांच्या साक्षी पुराव्या करिता २ जानेवारी २०२५ ही तारीख मूक्रर करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपी क्र.१ पवन सेदानी, क्र. २ अल्पेश दुधे, क्र. ३ श्याम नाठे, क्र. ४ गुंजन चिंचोळे, आरोपी क्र. १ ते ४ रा. आकोट, क्र. ५ निखील सेदानी रा. इंदोर मध्येप्रदेश, क्र.६ शुभम जाट रा. फिफरिया जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश, क्र. ७ शहाबाज खान, शेंदवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश या सर्व आरोपींनी कट कारस्थान करून दि. २१. ०२.२०२० चे रात्री १०.०० वा.चे सुमारास तुषार पुंडकर याचेवर गावठी पिस्तोल मधुन गोळी झाडून त्याला ठार मारले.

अशी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर सांगळे यांनी दिली. त्यावरुन वरील सर्व आरोपींविरूध्द तपास करण्यात आला. त्याचेवर विविध कलमांतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. वरील ७ आरोपींपैकी श्याम नाठे, राहणार आकोट हा आरोपी अजुनही कारागृहामध्ये बंदीस्त आहे.

या प्रकरणात विद्यमान मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी सदरचा खटला जुन २०२५ पर्यंत निकाली काढावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकरणात सरकार तर्फे विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील अजित देशमुख यांनी वरील खटल्यामध्ये सरकार तर्फे एकूण २७ साक्षीदारांची यादी दाखल केली आहे.

त्यापैकी या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर शालीग्राम सांगळे ब.नं. २४६ यांची साक्ष दि. १३.११.२०२४ रोजी वरील खुन खटल्यामध्ये नोंदविण्यात आली. त्यामध्ये आज दि. १७.१२.२०२४ रोजी दुसरा साक्षीदार शैलेश विजयराव मेतकर घटनास्थळपंच यांनी साक्ष सरकार तर्फे नोंदविण्यात आली.

या साक्षीदाराच्या उर्वरित राहिलेलख साक्ष पुरावा नोंदविण्याकरिता दि. ०२.०१.२०२५ रोजी ही तारीख ठेवण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांच्यातर्फे जी २७ साक्षीदारांची यादी या खटल्यात दाखल केली होती, त्यापैकी एका साक्षदाराची साक्ष व उलटतपास पुर्ण झालेला आहे.

म्हणजेच अजून यामध्ये एकूण २६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविणे बाकी आहे. व त्यानंतरही सरकार पक्षातर्फे नवीन साक्षीदारांची यादी दाखल केल्या जावू शकते असे विद्यमान न्यायालयास कळवले आहे. या प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. सत्यनारायण जोशी, ॲड. दिपक कुटे, ॲड. राहुल वानखडे, तसेच सरकार तर्फे विशेष सरकारी वकील विनोद फाटे विद्यमान न्यायालयात उपस्थीत होते. सरकार पक्षाला या प्रकरणात ॲड. अंजुम काझी सहकार्य करित आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: