अकोला (संतोषकुमार गवई)
डिजिटल माध्यमातील विकृती घालविण्यासाठी बालसंस्कार शिबिर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र गिते यांनी केले. श्रीगुरूदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचा समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. सोमवारी द. 20 मे 2024 रोजी संध्याकाळी 6 वा. श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दि. २ ते २० मे पर्यंत आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सुसंस्कार शिबीराचे हे ४४वे वर्ष असुन या संस्कार यज्ञाचा समारोपीय कार्यक्रम निमंत्रीत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर शिखरे प्रती इतिहासकार, शिवचरित्र संशोधक, प्रमुख पाहुणे- मा. भगतसिंग राजपूत, खामगाव प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक – मा. जितेंद्र गिते, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी श्री गीते पुढे बोलताना म्हणाले की सध्या समाज माध्यमांचा प्रभाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आहे.
अशावेळी संस्कार मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्याबरोबरच मुलांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी बाल संस्कार शिबिरांची खूपच गरज आहे ती या माध्यमातून पूर्ण होत आहे त्यामुळे मी अकोला मलकापूर येथेही बाल संस्कार शिबिराचा आयोजन व्हावं यासाठी निमंत्रक म्हणून भूमिका पार पाडण्यास तयार आहे. सायंकाळी ६-०० वा. , दिप प्रज्वलन, बौध्दीक व भजनाचे प्रात्याक्षिके,सायंकाळी ६-३० वा. ते ७-०० वा. सामुदायिक प्रार्थना, रात्री ७ ते ९ वा. व्यायामाचे प्रात्याक्षिके, वक्त्यांची भाषणे, राष्ट्रवंदना संपूर्ण शिबिर यशस्वीपणे श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा खुर्द, राष्ट्रधर्म युवा मंच नांदुरा यांनी पार पाडले