Saturday, December 21, 2024
Homeराजकीयखासदार हेमंत पाटलांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार...

खासदार हेमंत पाटलांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार…

(शुभम शिंदे)

किनवट- महाराष्ट्रात महविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात असताना शिवसेनेतून वेगळे होत आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधीपक्ष भाजप सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार घालवून शिवसेना भाजप-युतीचे सरकार आणत राज्यात सत्ताबदल केला. मात्र राज्यातील सत्ताबदलानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल आणि त्यांची साथ देणाऱ्या आमदारांना मंत्रिपद मिळाली, पण एकनाथ शिंदेची साथ देणाऱ्या खासदारांच्या पदरात मात्र अजूनतरी काहीच पडलेलं नाही.

आज भाजपची साथ देणारा शिवसेना हा १२ खासदारांसह NDA मधील भाजपचा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात २ मंत्रिपद मिळणार हे निश्चित झालंय. तर या २ पैकी १ मंत्रीपदासाठी नाव निश्चित झालंय ते म्हणजे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील.
शिवसेनेतील अनेक मातब्बर नेत्यांना मागे टाकत खासदार हेमंत पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे वाचून अनेकांना धक्का बसणार आहे. पण लोकसभेची पहिलीच टर्म असणाऱ्या हेमंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार यामागे महत्वाचे कारण म्हणजे हेमंत पाटील प्रतिनिधित्व करत असणारा हिंगोली लोकसभा मतदार संघ.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली हे ३ विधानसभा मतदारसंघ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हादगाव विधानसभा मतदारसंघ तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.याकारणे या एका लोकसभा मतदारसंघामुळे ३ जिल्ह्यामध्ये पकड निर्माण करता येते.१९७७-८० या काळात भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण त्यानंतरच्या काळात या मतदारसंघात भाजप वगळता राज्यातील तीनही मुख्य पक्षांनी अनुक्रमे हा मतदारसंघ काबीज केला. त्यामुळे ४५ वर्षानंतर पुन्हा हा मतदारसंघ काबीज करण्याचा मानस भाजपचा आहे.

ज्यामुळे हा मतदारसंघ सोडण्यासाठी हेमंत पाटील यांची बोळवण मंत्रीपदावर करण्यात येणार आहे. यासाठी स्वतः एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी हेमंत पाटील यांची मनधरणी केली असून पुन्हा विधानसभेत हेमंत पाटील यांचे पुनर्वसन करण्याची जबादारीही फडणवीस यांनी घेतल्याची चर्चा आहे. व यामुळे हिंगोली मतदारसंघाला मंत्रिपद दिल्यास आगामी लकसभा निवडणुकीत याचा फायदा भाजपला व भाजपचे २०२४ मधील उमेदवार होऊ पाहणाऱ्या रामदास पाटील सुमठानकर यांनाच होणार यात शंका नाही.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: