अकोला – अलीकडेहिंदू -मुस्लिमच्या नावाखाली वातावरण गढूळ होत आहे. हिंदू राष्ट्र करायचे अशा भुलताबाद देऊन भरकटण्याचे काम व्यवस्थितपणे यंत्रणा करीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंतांच्या प्रचाराकांनी पुढे येण्याची गरज आहे. केवळ भगवी टोपी घालून चालणार नाही तर राष्ट्रसंतांनी सांगितलेले साहित्य वाचण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला राष्ट्रधर्म जर निर्माण करायचा असेल तर धर्माची व्याख्या आपल्याला समजून घेण्याची गरज आहे.
आणि ती समजून समाजात पेरण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या संविधानाची मूल्य ही राष्ट्रसंतांच्या राष्ट्रधर्मांमध्ये जोपासले गेली आहेत. असा सूर विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित दुसऱ्या परिसंवादात शनिवारी उमटला.
विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रधर्म ही सही! धर्म है और धर्म एकांग! या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या अध्यक्ष म्हणून ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक हे होते. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा जावेद पाशा हे होते. व्यासपीठावर संमेलना अध्यक्ष चंदूभाऊ पाटील, रविदादा मानव, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
रवी दादा मानव यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला राष्ट्रधर्म विशद केला. यानंतर या परिसंवादाचे प्रमुख वक्ते प्रा जावेद पाशा यांनी आपल्या भाषणातून इस्लामिक कालखंड हिंदू कालखंड आणि ब्रिटिश कालखंड यामधील वास्तव मांडले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना अपेक्षित असलेले प्रचारक हे वास्तववादी असले पाहिजेत वास्तव समजून घेण्यासाठी आपण राष्ट्रसंतांचे साहित्य वाचले पाहिजे असा सल्ला त्यांनी प्रचारकांना यावेळी दिला.
राष्ट्रसंतांची भजने हे राष्ट्र धर्माची खरी शिकवण देणारी. भारत माझा देश आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांचे साहित्य मूळ गाभा आहे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही देशाला सर्व बाजूंनी समृद्ध करणारी आहे राष्ट्रसंतांच्या प्रचारकांनी केवळ भगवी टोपी घालून चालणार नाही संस्कृती समजून घेतली पाहिजे. यावेळी त्यांनी 1857 पासून तर स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक प्रसंग आपल्या भाषणातून अभ्यासपूर्ण मांडले.
यानंतर या परिसराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रधर्म म्हणजे भक्ती मार्ग नसून देशसेवेची बीजे रोवणारा आहे. गुरुदेव सेवकांनी आता सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे त्यांना जवळ घेतलं पाहिजे आणि सर्व धर्मांची शिफन देणारा राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म हा प्रत्येकाला समजावून सांगितला पाहिजे.
प्रदर्शन करण्यासाठी वागू नये किंवा भगवी टोपी घालू नये हे शिकवण देत असतो. रक्षक यांनी आपल्या भाषणातून अनेक अभ्यासपूर्ण म ते विशद केली. भाऊसाहेब थुटे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेले प्रचारक कसे असावे याची मांडणी केली.या सत्राचे संचालन मयूर वानखडे यांनी तर आभार तुषार बरगट मानले.