Saturday, December 21, 2024
Homeराज्य११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेला नराधम शिक्षक पोलिसांच्या जाळ्यात…

११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेला नराधम शिक्षक पोलिसांच्या जाळ्यात…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

राज्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानांच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे
एका नामांकित शाळेतील नराधम शिक्षकाने ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबात सविस्तर माहिती अशी की,आरोपी अमोल लोंढे हा एका खासगी शाळेत शिक्षक असून, तो अतिरिक्त वर्ग घेत होता. या साठी तो मुलांना शाळेत बोलवत होता. याच क्लासमध्ये त्याने कुणी नसल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, भीतीपोटी मुलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही.पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी नुसार पीडित मुलगी ही शाळेत क्लासेस करता आली होती.

यावेळी अमोल लोंढे या आरोपी शिक्षकाने मुलीला ऑफिसमध्ये चल म्हटले. यानंतर त्याने ऑफिसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला धमकावत दोन गोळ्या खान्यासाठी दिल्या. यानंतर पीडित मुलीवर त्याने कार्यालयात बलात्कार केला. यानंतर तिला धमकावले तसेच तिला आणि तिच्या घरच्यांना जीव मारण्याची धमकी आरोपीने दिली.

मात्र, मुलीला त्रास होत असल्याने या घटनेची कुणकुण घरच्यांना लागली. पालकांनी विश्वासात घेऊन तिला या प्रकरणी माहिती विचारली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालकांनी मुलीला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत त्या नराधम शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून आरोपी अमोल लोडेवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटने नंतर आरोपी झाला होता फरार…

फरार आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनिय माहिती
विश्वसनीय सूत्रानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होवून मुंबईला पळून
जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोडे, वय 28 वर्ष, रा. कोरपना, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपुर यांस रात्री अकोला येथील बस स्थानकातुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुरं यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार,पोहवा. धनराज करकाडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आराडे, पोशि. मिलींद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: