सांगली – ज्योती मोरे
दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी करणार रोडवरील म्हसोबा मंदिराशेजारील शेतात काम करत असलेल्या अजित बाबुराव अंगडगिरी वय वर्ष 19 या महाविद्यालयीन युवकाचा काही जणांनी धारदार हत्यारांना वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
याबाबत पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तपासाचे आदेश सांगली शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवल्याने खास बातमीदारामार्फत, हा खून सुफियान फिरोज बागवान राहणार शंभर फुटी रोड रजाक गॅरेजच्या मागे, सांगली.सुजित राजाराम शिंदे वय वर्ष 18 शामराव नगर, दुर्वांकुर कॉलनी सांगली. आणि सौरभ सदाशिव वाघमारे वय वर्षे 20 राहणार एमएसईबी शंभर फुटी रोड सांगली.
या तिघांनी मिळून केल्याची व यापैकी सुजित शिंदे आणि सौरभ वाघमारे हे वारणाली विश्रामबाग मध्ये तर सुफियान बागवान हा ताणंग फाटा येथे असल्याचे सांगण्यात आले.त्यानुसार पोलिसांनी छापे मारून या दोन्ही ठिकाणाहून तिघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदरचा खून हा काही दिवसांपूर्वी झालेल्या वादावादीचा राग मनात धरून केला असल्याचे सांगण्यात आले.
सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली शहर पोलीस ठाण्याने अवघ्या आठ तासात उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख आणि त्यांच्या टीमने केली आहे.