मुंबई – धीरज घोलप
पार्क साईट येथील शिवकृपा सोसायटी , वार्ड क्रं १२४ अंतर्गत असलेल्या दुमजली शौचालय महापालिकेने अति धोकादायक ठरवले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा वित्तहानी टाळण्याकरिता महापालिकेने ४ महिन्यापूर्वी हे शौचालय कायमचे बंद केले. परंतु या शौचालयाच्या सांगाडा अजूनही धूळ खात पडून आहे. हे दुमजली भले मोठे शौचालय कधी कोसळेल याचा नेम नाही विशेष म्हणजे या दुमजली भल्या मोठ्या शौचालयाच्या आजूबाजूला ५०-६० घरे आहेत.
या पावसाळ्यात मोठा वारा किंवा मोठे वादळ आले तर हे शौचालय कोसळण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट महानगरपालिका घाटकोपर “एन” वार्ड येथील वरिष्ठ अधिकारी पाहत आहे का? असा प्रश्न स्थानिक रहिवाशी उपस्थित करत आहे.
शिवकृपा सोसायटी, आंनद गड, शंकर मंदिर, पार्क साईट परिसरातील मध्यभागी असलेल्या दुमजली शौचालय महापालिकेने अति धोकादायक ठरवले असून येथे जीवित आणि किंवा वित्तहानी होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही म्हणून महापालिकेने गेल्या ४ महिन्यापासून हे शौचालय कायमचे बंद केल.
हे शौचालय खूप जुने आहे. रोज आजूबाजूला स्लॅप पडत असतात. जर या पावसात मोठा वारा किंवा वादळ आले तर हे शौचालय कधीही कोसळेल व मोठ्या प्रमाणात आजूबाजूला राहणाऱ्या निष्पाप जीवाचे प्राण घेतील. याच घाटकोपरमध्ये “एन” वार्ड हद्दीमध्ये होल्डिंग चा सापळा कोसळून 17 निष्पाप जीवांचे बळी गेला होता याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ठोस पावले उचलली पाहिजे. या संदर्भात परिरक्षण -२ विभागाचे आनंद पांचाळ यांना वारंवार संपर्क करूनही कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.