Wednesday, October 30, 2024
Homeगुन्हेगारीमोबाईल चोरट्याने पोलिसाच्या खात्यातून केले चक्क पावणे दोन लाख रुपये लंपास...

मोबाईल चोरट्याने पोलिसाच्या खात्यातून केले चक्क पावणे दोन लाख रुपये लंपास…

महेंद्र गायकवाड
नांदेड

शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी धीरजकुमार कोमलवार यांचा मोबाईल चोरट्याने चोरल्या नंतर त्यांचा बँक खात्यातून पावणे दोन लाख रुपये मोबाईल द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले असून या अज्ञात चोरट्या विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड शहरात मोबाईल चोरांचे प्रमाण मोठया संख्येने वाढले असून याचा फटका पोलिसांना देखील बसला आहे. इतवारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी धीराजकुमार हे दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आनंदनगर रोडवर फळाच्या गाड्यावर फळे घेताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टवरील खिशातून विवो 21 प्रो कंपणीचा आकाशी रंगाचा मोबाईल किंमती 20,000/- रूपयाचा घेऊन पसार झाला. त्यानंतर त्या चोरट्याने पोलीस कर्मचारी धीराजकुमार यांच्या एसबीआय अकांउट मधुन 1,76,000/- रूपये वेगवेगळ्या बँकेचे खात्यावर पाठवुन चोरी केली.

मोबाईल बंद असल्यामुळे त्यांना मोबाईल चोराने त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज आला नाही. आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला गेल्याचे कळल्यानंतर धिरजकुमार गंगाधर कोमलवार यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध पोस्टे शिवाजीनगर येथे गुरन 321/2022 कलम 379 भादवी सह कलम 60(बी) (सी) (टी) आयटी ॲक्ट कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक काशीकर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: