गणेश तळेकर, मुंबई
३० – ४० वर्षांपुर्वी आपल्या नुर्त्याने घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर हिची आताची अवस्था बघून मन खिन्न झाले, तिचा पहाडी आवाज आणि अदाकारीपाहून कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. ज्यातून शांताबाई ५०- ६० लोकांचे पोट भरायच्या. यात्रेत, नाट्यगृहात त्याच्या अदाकारीवर टाळ्या पडायच्या. पण वय झालं, चेहऱ्यावर सुरकरुत्या आल्या आणि तमाशाचा फड बंद झाला. तिच्यावर उपासमारीचे जीवन जगन आलं, तर आता तिला शिर्डीच्या साईबाबा हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलंय.
लावणी सम्राज्ञी शांताबाई यांची आपल्या असोसिएशनच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन भेट घेतली व चौकशी केली २१/६/२०२३ रोजी त्याच बरोबर आखिल भारतीय तमाशा परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष श्री संभाजीराजे जाधव यांच्या सोबत मी फोन वर चर्चा केली ते आणि त्यांचे सहकारी पण २२ जून ला कोपरगाव येथे जाऊन चौकशी केली आणि शिर्डीच्या साईबाबा हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. तसेच शांताबाई यांना जीवनाशक लागणार्या वस्तू त्यांना देण्यात आल्या आहेत.
शांताबाई यांचे भाऊ त्यांची बायको. आणि इतर नातेवाईक कोपरगाव येथे राहतात तिचा सांभाळ पण करतात परंतु शांताबाई यांचे मानसिक संतुलन हरपल्याने ही परिस्थिती त्यांची आहे. समस्त तमाशा फड मालकांनी त्यांची दखल घेतली आहे. त्यांना औषधे उपचारांची गरज आहे.
आपण सर्वांनी देवा जवळ हिच प्रार्थना करावी शांताबाई यांची तब्बेत पुर्णपणे बरी व्हावी यासाठी ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई (अध्यक्ष) श्री सुभाष जाधव यांनी केली आहे…