Saturday, November 23, 2024
HomeAutoएमजी झेडएस ईव्ही नवीन इंटीरिअर रंगांसह होणार सादर...

एमजी झेडएस ईव्ही नवीन इंटीरिअर रंगांसह होणार सादर…

ड्युअल-टोन आयकॉनिक आयव्हरी इंटीरिअर्समध्ये उपलब्ध होईल…

एमजी मोटर इंडियाने आज त्यांच्या नवीन झेडएस ईव्ही एक्सक्लुसिव्ह व्हेरिएण्टमध्ये नवीन इंटीरिअर रंगांच्या सादरीकरणाची घोषणा केली. ही कार आता ड्युअल-टोन आयकॉनिक आयव्हरी इंटीरिअर्समध्ये उपलब्ध असेल. कंपनीने नवीन झेडएस ईव्ही एक्साइटच्या बुकिंग्जना ३ ऑक्टोबर २०२२ पासून सुरूवात केली आहे.       

झेडएस ईव्ही एक्साइट ग्राहकांना ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये, विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरी, तसेच जगभरात प्रमाणित दर्जा: एएसआयएल-डी, आयपी६९के व यूएल२५८० सह पॉवर-पॅक इलेक्ट्रिक मोबिलिटी अनुभव देते. १७६ पीएस शक्तीसह नवीन प्रगत तंत्रज्ञान बॅटरी एकाच चार्जमध्ये ४६१ किमी प्रमाणित रेंज देते.

या कारमध्ये विभागातील सर्वात मोठे २५.७ सेमी एचडी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट, तसेच इतर अनेक सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये, जसे ३६०-डिग्री ऑन-राऊंड व्ह्यू कॅमेरा व डिजिटल की आहे. झेडएस ईव्ही एक्साइटमध्ये फुल डिजिटल क्लस्टरसह सेगमेंट-बेस्ट १७.७८ सेमी एम्बेडेड एलसीडी स्क्रिन व अधिक सुरक्षिततेसाठी हिल डिसेंट कंट्रोल (एचडीसी) आहे.

ड्रायव्हिंग अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी बेस व्हेरिएण्टमध्ये पार्किंग बुकिंगकरिता पार्क+ नेटिव्ह अॅप आणि मॅपमायइंडिया ऑनलाइन नेव्हिगेशन सिस्टिमसह लाइव्ह ट्रॅफिक, लाइव्ह वेदन व एक्यूआय आहे. तसेच जवळचे रेस्टॉरंट्स व हॉटेल्सची माहिती मिळण्यासाठी इंटीग्रेटेड डिस्कव्हर अॅप देखील आहे. सिस्टिममध्ये फर्मवेअर ओव्हर-द-एअर (एफओटीए) अपडेट क्षमता देखील आहे.

झेडएस ईव्ही युनायटेड किंग्डम, युरोपचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, थायलंड, चीन, पेरू, चीली व भारतामध्ये उपलब्ध आहे. वेईकलच्या ईव्ही व्यासपीठाचे इतर सर्वांमध्ये सतत कौतुक करण्यात आले आहे, ज्यामधून एमजीचे इलेक्ट्रिक पॅसेंजर वेईकल उत्पादनामधील जागतिक अग्रणी स्थान दिसून येते. एमजी झेडएस ईव्हीने जगभरातील प्रमुख बाजारपेठांववरील वर्चस्व कायम राखले आहे. हाय-टेक, हाय-परफॉर्मन्स ईव्हींसाठी मागणी झपाट्याने वाढत आहे. ऑटोमेकर याकडे अत्यंत उदयोन्मुख विभाग म्हणून पाहत आहे.

एमजी मोटर इंडिया भारतात ईव्ही अवलंबतेचे प्रमाण वाढवत देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी परिसंस्था प्रबळ करण्याशी कटिबद्ध आहे. कार मालकांकरिता एकसंधी ईव्ही अनुभव निर्माण करण्यासाठी कारमेकरने जिओ-बपी, कॅस्ट्रॉल व बीपीसीएल यांसारख्या प्रमुख कंपन्यांसोबत धोरणात्मक सहयोग केला आहे.

कंपनी शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग करत ईव्ही क्षेत्रातील संशोधन व नवोन्मेष्काराला देखील चालना देत आहे. नुकतेच आरव्ही कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, बेंगळुरू सोबतच्या सहयोगासह एमजीने त्यांचा कौशल्य विकास उपक्रम एमजी नर्शरचा भाग म्हणून ईव्ही प्रमाणन अभ्यासक्रम सुरू केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: