गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडीच्या सभागृहात गोंदिया जिल्हा लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया ) ची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजेश कटरे,कार्यकारी संचालक, जं. का. से. स. संस्था पुणे, प्रमुख उपस्थिती माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले सरपंच एकोडी, अजाब रिनायात पं. स. सदस्य, सामाजिक कार्यकर्ता उमेश भांडारकर, किरणकुमार मेश्राम माजी उपसरपंच व पत्रकार उपस्थित होते. लोककला सेवा मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकून मंडळाच्या कार्याला समोर नेण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे याविषयी विस्तृत अशी माहिती लोककला सेवा मंडळाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष संजय कटरे यांनी दिली. महिला अध्यक्ष लीलावती रहांगडाले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
खऱ्याअर्थाने कलावंतांनाच न्याय मिळावा, त्यांना मिळणारे लाभ हे कलावंतांव्यतिरिक्त इतरांना मिळायला नको याविषयी लोककला सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सावध रहावे अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश कटरे यांनी केली. सभेला जवडळपास 110 कलावंतांनी उपस्थिती दर्शविली. सूत्रसंचालन गोंदिया जिल्हा महासचिव संजय पारधी यांनी केले. या सभेचे आयोजन लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले, कोषाध्यक्ष श्वेता रहांगडाले व सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवटी सर्व उपस्थित पाहुण्यांचे व कलावंतांचे निता पटले यांनी आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.