सांगली – ज्योती मोरे.
सांगली मार्केट यार्ड हे संपूर्ण महाराष्ट्रातील नावाजलेला मार्केट यार्ड असून या मार्केट यार्ड आज सध्या रस्ते पाणी स्वच्छता सार्वजनिक स्वच्छतागृह यांचा अभाव आहे.
याकडे मार्केट कमिटीने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे त्याचबरोबर प्रत्येक तीन महिन्यांमध्ये एकदा व्यापाऱ्यांबरोबर बैठक घ्यावी,असे मत चेंबूर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ बेदाणा व्यापारी मनोहर भाई सारडा यांनी व्यक्त केले आहे.
आज त्यांच्या दुकानात मार्केट कमिटीचे नवनियुक्त चेअरमन सुजय नाना शिंदे यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते उपस्थित समोर बोलत होते.
यावेळी संचालक पप्पू मजलेकर, संग्राम पाटील,कडप्पा वारद अभय पाटील ,बन्सी काका, राजेंद्र पाटील, मनीष कोठारी, अटल शेठ, सुनील पट्टणशेट्टी, बी एल पाटील, रवींद्र चिवटे, आरटी कुंभार, वरुण मालू, एम एम पटेल,शशिकांत नागे मारुती बंडगर,स्वप्नील शिंदे, आनंदराव नलवडे, अमरसिंह देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.