न्यूज डेस्क : वंचित शोषित पीडित अनारक्षित गरीब मराठ्यांसाठी काल धाराशिवच्या दौर्यात वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांना बीडमधूनच आगामी लोकसभा लढण्याची गळ घातली आहे. दिनांक 24 रोजी बीड येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजातील शिष्टमंडळाने काल विश्रामगृहावर भेट घेतली आणि बीड ची लोकसभा आपण लढवावी आणि आमचे नेतृत्व करावे जेणेकरून आम्हाला आरक्षणसाठी मोलाची मदत होईल. सध्या बीड जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या भूमिकेवर येथील मराठे नाराज असल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्षापासून अकोल्यातून सुरू झालेला वंचितांसाठीचा हा लढा जोर पकडू लागलेला आहे. नुकतीच अमरावती मध्ये झालेल्या सभेला लक्षावधी लोकांनी हजेरी लावून बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितांच्या लढ्याला जोरदार समर्थन दिले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक दशकापासून अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब शोषित पीडित वंचित समाजातील सर्व घटकातील सर्वांना ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा स्तरावर संधी दिली आहे, त्यामुळे सामाजिक विषमता दूर होण्यास मोठी मदत झाली आहे, त्याबरोबरच सत्तेचे सूत्र वंचितांकडे आल्यामुळे त्यांच्या मूलभूत विकासासाठी हातभार लागला आहे.
कालच्या धाराशिवच्या सभेमुळे मराठा समाजामध्ये चैतन्य निर्माण झाला आहे त्याबरोबरच बाळासाहेब आंबेडकर मराठ्यांना आशेचा किरण वाटत आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने भेट घेऊन बीड मधून लढण्याचा आग्रह केला. यावेळी यावेळी मराठ्यांच्या शिष्ट मंडळातील किशोर गिराम, प्रदेश युवक अध्यक्ष मराठा महासंघ, अशोक हिंगे, मराठा समन्वयक, वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष यांच्यासह अकोला येथून जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, विनोद आम्बुस्कर इतर मराठा कार्यकर्ते यावेळी हजर होते.