बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापुरातील मुख्य रस्त्यावरील अकोला नाका ते खामगाव नाका दरम्यान असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खडयांमुळे अपघाताची शक्यतानिर्माण झाली आहे. यामुळे वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
बाळापूर शहराच्या मध्य भागातून मुंबई-हैदराबाद हा महामार्ग जात असून या मार्गावरून दिवसभरात शेकडो वाहनांची वर्दळ राहते. याच मार्गावरील बाळापूर शहरातील अकोला नाका ते खामगाव नाका या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळे रस्त्याची अगदी चाळणी झाली आहे.
या रस्त्यावरून वाहन नेणे तर सोड़ाच साधे पायी चालणेही मुश्कील होऊन बसले आहे. याचमार्गालगत श्रीमती धनाबाई विद्यालय तसेच पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल व उर्दू अध्यापन महाविद्यालय आदीशैक्षणिक संस्था आहेत. शहरातील हजारो विद्यार्थी याच रोडने आपल्या शैक्षणिक संस्थेत जाणे- येणे करतात.
अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावर दररोज वाहनांची ये-जा असल्यामुळे वरील शैक्षणिक संस्थेत जाणाऱ्या विद्यार्थांना अगदी जीव मुठीतघेऊन जावे लागते. तर या खड्यांमुळे वाहनचालक सुद्धा त्रस्त झाले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे मात्र या गंभिर बाबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिक करित आहेत