Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीपत्रकार एजाज खान यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या निषेधार्थ, समस्त पातूर तालुक्यातील...

पत्रकार एजाज खान यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या निषेधार्थ, समस्त पातूर तालुक्यातील पत्रकार च्या वतीने पातूर प्रशासन ला निवेदन सादर…

पातूर – निशांत गवई

मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत आव्हाळे हॉस्पिटल,शिवाजीनगर परिसरात दैनिक खोज मास्टर चे विभागीय प्रतिनिधी एजाज खान यांच्यावर रेशन माफिया वरली माफिया फिरोज कुरेशी यांच्या मुलगा ऑफरोज कुरेशी व त्याच्या मित्रांकडून जीव घेणा हल्ला करून मारहाण केली. अफरोज कुरेशी यांच्या रेशन तस्करी बाबत खोज मास्टर मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. याच अनुषंगाने साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली आहे.

या घटनेचा वाचवा मनात ठेवून. अफरोज कुरेशी व त्याच्या मित्रांनी एजाज खान यांच्यावर जीव घेणा हल्ला केला. तसेच हात पाय तोडून जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. पत्रकाराच्या जीवितास धोका आहे. पत्रकाराची मुस्कटदाबी करणाऱ्या वरली माफी यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा राज्यभरात पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील. याची नोंद असावी. याकरिता सविनय सादर.

यावेळी पत्रकार खुदुस शेख , उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, निशांत गवई, देवानंद गहिले, सतीश सरोदे, किरण कुमार निमकंडे, निखिल इंगळे स्वप्नील सुरवाडे, रामेश्वर वाढी,अविनाश गवई सर्व पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: