Monday, December 23, 2024
Homeसामाजिकरामटेक येथे जनसंवाद यात्रेचे थाटात समापन...

रामटेक येथे जनसंवाद यात्रेचे थाटात समापन…

कन्हान पासुन प्रारंभ, रामटेकमध्ये समापन…

नाना पटोलेंची विशेष उपस्थिती…

रामटेक – राजू कापसे

रामटेक – सध्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी ची जनसंवाद यात्रा सुरु आहे. ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत या जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज दि. ८ सप्टेंबर ला कन्हान ते रामटेक असे जनसंवाद यात्रेचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा नागपुर ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केलेले होते.

सायं ६ च्या दरम्यान कन्हान पासुन निघालेली जनसंवाद यात्रा रामटेक ला पोहोचली. यावेळी मात्र पाऊस चांगलाच बरसत होता तरीही शेकडो कार्यकर्ते या यात्रेत सहभाग झालेले होते व भिजतच सभास्थळी पोहचले हे येथे विशेष. शहरातील गंगाभवनम सभागृहात सायं. ७ च्या सुमारास जाहीर सभेस सुरुवात झाली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. यानंतर पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जि.प. अध्यक्ष, अरविंद गजभिए, राजेंद्र मुळक, सुनील केदार यांची भाषणे झालीत. यात राजेंद्र मुळक यांनी या जनसंवाद यात्रेचा उद्देश म्हणजे सर्वसामान्यांच्या अडचणी तथा समस्या जाणुन घेणे हे आहे.

ही कन्हान पासुन सुरु झाली ती पारशिवनी होत रामटेक ला आज त्याचे समापन झालेले आहे. नागरीकांनो आपल्याला समस्यांना सामोरे जायचे आहे, आज नागपुर जिल्ह्यात सर्वांत मोठी ताकत काँग्रेस पक्षाची असुन जो उमेदवार वरीष्ठ देतील तो या क्षेत्रातुन निवडन येईल असे सांगत मुळक यांनी नागरीकांना ‘ समोर कामाला लागा ‘ असे सांगीतले.

जोडो जोडो भारत जोडो छोडो छोडो नफरत छोडो असा नारा यावेळी सभागृहात लावण्यात आला. संचालन काँग्रेस कमेटी चे रामटेक शहर अध्यक्ष दामोधर धोपटे यांनी तर आभार प्रदर्शन माजी जिल्हा परीषद सदस्य कैलास राऊत यांनी केले.

यावेळी उपस्थितांमध्ये म. प्रदेश काँग्रेस कमेटी चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोल, आमदार सुनील केदार, नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, नाना गावंडे, आमदार अभिजीत वंजारी, जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकोडे , उपाध्यक्ष, निरिक्षक दरेकर, किशोर गजभिए, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, कृ.उ. बाजार समिती सभापती सचिन किरपान सुरेश भोयर, माजी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, जि.प. सदस्या शांता कुमरे यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये – नाना पटोले

हे येड्यांचं सरकार आहे. हे सरकार नागरीकांना घर, नळ व पाणि देणार होतं पण नागरीकांना घरंच मिळाले नाही तर नळ आणि पाणि दुरच राहालेले आहे. जुनी पेन्शन सुरु केली पाहिजे. ओबीसींना स्कॉलरशिप का नाही. शिक्षक भरती केली पाहिजे. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, हिम्मत हारु नये.

आज शेतकऱ्यांपुढे खुप संकट आहेत. शाशनाने तलाठी भरतीतुन खरबो रुपये कमविले आणि त्यात आपल्या जवळच्या बगलबच्च्यांचे कॅन्डेड नियुक्त केले. येत्या निवडणुकीत काँग्रेस च्या उमेदवाराला साथ द्या असे प्रतिपादन यावेळी नाना पटोले यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: