- उमठा, साखरखेडा, मालटेकडी, पारधी बेडा उमठा या ठीकाणी टाकल्या धाडी.
- 140 लिटर गावठी दारू केली जप्त.
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चेतनसिंग चौहान यांनी अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाहीला सूरवात केली असून मंगळवारी 4 वेग वेगळ्या ठिकाणी ठाणेदार यांनी धाड टाकत गावठी दारू साठा जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार चेतनसिंग चौहान आपल्या सहकाऱ्यांना सोबत मंगळवारी उमठा, साखरखेडा (फाटा), मालटेकडी, पारधी बेडा उमठा या ठिकाणी धाडी टाकल्या व गावठी दारू भट्या उद्ध्वस्त केल्या. व त्या ठिकाणावरून 140 लिटर मोहाफुल गावठी दारू किंमत 7 हजार रूपये व 26 देशी दारूच्या बॉटल किंमत 1 हजार 520 असा एकूण 8 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला व दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद केले आहे.
ही कार्यवाही ठाणेदार चेतनसिंग चौहान, पोलिस उपनिरीक्षक मनोज शेंडे, पोलीस अंमलदार संजय रिधोरकर, निलेश खेरडे, दिनेश जोगेकर, फिरोज शेख, शिवदास सौंदाळे, शंकर आचट व होमगार्ड या पथकाने केली असून पुढील तपास ठाणेदार चेतनसिंग चौहान यांचे मार्गदशर्नात निलेश खेरडे व शिवदास सौंदाळे करित आहे.