बांधकामासाठी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केली आर्थिक मदत .
अहेरी – अहेरी येथील बौद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी आ.तथा भारत राष्ट्र समितीचे नेते दीपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.
अहेरी उपविभागात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप मोठी असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.
अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.
या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांची आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाजासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे सचिव प्रशांत भीमटे, संजय ओंडरे,आविस शहराध्यक्ष मिलिंद अलोने,आविस सल्लागार महावीर अग्रवाल,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.