Sunday, December 22, 2024
Homeराज्यदेशात भाजपा विरोधी सर्व पक्षांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडी ला राष्ट्रवादी काँग्रेस...

देशात भाजपा विरोधी सर्व पक्षांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडी ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज समर्थन दर्शवण्यात आले…

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब , सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी महिला आघाडी च्या पुढाकाराने समर्थन करण्यात आले.

इंडिया आघाडी ची राष्ट्रीय पातळीवरची तिसरी बैठक मुंबई येथे संपन्न होत आहे , या पार्श्वभूमीवर सांगली मध्ये आज इंडिया आघाडी च्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून पाठींबा देण्यात आला , गेले नऊ वर्ष भाजपा सरकार कार्यकाळात संपूर्ण देशामध्ये महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार व जातीवाद या सारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत परंतू या सर्व प्रश्नांकडे सध्याचे सत्तेतील भाजपा सरकार दुर्लक्ष करत आहेत,

येणाऱ्या काळा मध्ये सर्व जनताच अश्या सरकार ला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही, अश्या भावना पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे , मा. नगरसेवक विष्णू माने ,हरिदास पाटील, सांगली शहर महिला अध्यक्षा अनिता पांगम ,मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे,

विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा छाया जाधव ,उत्तम कांबळे ,युवराज गायकवाड , आयुब बारगिर ,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे,अर्जुन कांबळे, संदीप व्हनमाने, विद्या कांबळे, अमृता चोपडे, संगीता जाधव , सुरेखा सातपुते , रुपाली कारंडे ,सुनीता जगधने , रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला ,भीमराव बेंगलोरे ,प्रकाश सुर्यवंशी,प्रकाश मदने, अरुण चव्हाण ,आप्पासो ढोले, सचिन सगरे , आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: