Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीगडकरींना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली…कारागृहात बंद असलेल्या या गुंडाने केला होता...

गडकरींना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली…कारागृहात बंद असलेल्या या गुंडाने केला होता फोन…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त (CP) अमितेश कुमार यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमक्या येत होत्या. फोन करणारा जयेश कांथा हा कुख्यात गुंड आणि खूनाचा आरोपी असून तो कर्नाटकातील बेळगावी कारागृहात बंद आहे. कारागृहात बेकायदेशीरपणे फोन वापरून त्याने गडकरींच्या कार्यालयाला धमकावले.

कारागृह प्रशासनाने आरोपींकडून एक डायरी जप्त केल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले, नागपूर पोलिसांचे एक पथक तपासासाठी बेळगावला रवाना झाले आहे. नागपूर पोलिसांनी प्रॉडक्शन रिमांडची मागणी केली आहे. नितीन गडकरी यांना दोनदा कॉल करण्यात आला, प्रथम सात मिनिटांत, नंतर एक तासानंतर आणखी एक धमकीचा कॉल. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरींच्या नागपूर कार्यालयात सकाळी ११.२५, ११.३२ आणि १२.३२ वाजता तीन धमकीचे कॉल आले.

नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ : नागपूर डीसीपी
नागपूरचे डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले की, नितीन गडकरी यांना तीन धमकीचे फोन आले होते. गडकरींच्या सध्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.खामला भागातील गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयाला सकाळी ११.२५ ते दुपारी १२.३० दरम्यान तीन धमकीचे फोन आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी रात्री एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉल करणाऱ्याची ओळख पटली असून गुन्हे शाखेचे पथक कर्नाटकला पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: