Monday, December 23, 2024
Homeराज्यटी.सी.साठी चारशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिका बाई अडकल्या एसीबी च्या जाळ्यात...

टी.सी.साठी चारशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिका बाई अडकल्या एसीबी च्या जाळ्यात…

नांदेड – महेंद्र गायकवाड

किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा नेम्मानिवार यांनी टी.सी.देण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी आज (१७ जून) दुपारी नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयात एका पालकाने आपल्या मुलीची सातवी उत्तीर्ण झाल्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टी.सी.) देण्याची मागणी मुख्याध्यापिका सौ. वीणा नेम्मानिवार यांच्याकडे केली असता मुख्याध्यापिका यांनी टी.सी.काढण्यासाठी सहाशे रुपये द्यावे लागतील असे पालकास सांगितले.

परंतु पालकाला साहशे रुपये ही लाच असल्याची खात्री झाल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात जावून तक्रार दाखल केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचेची मुख्य आरोपी मुख्याध्यापिका यांची पडताळणी करण्यात आली.

आज दुपारी तक्रारकर्त्याकडून चारशे रुपयांची लाच पंचासमक्ष मुख्याध्यापिका सौ. वीणा नेम्मानीवार यांनी स्वीकारली. पालकाने पावतीची मागणी केली असता मुख्याध्यपिका नेम्मानीवार यांनी याची पावती नसते असे त्या पालकास कळविले. यावरून मुख्याध्यापिकेला ताब्यात घेण्यात आले असून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यां घटनेमुळे किनवट शहरात खळबळ उडाली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: