Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीचौहट्टा बाजार येथील 'गुटखा किंग' अखेर गजाआड...७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त...

चौहट्टा बाजार येथील ‘गुटखा किंग’ अखेर गजाआड…७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त…

दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

दहीहंडा दि. 11 (प्रतिनिधी) : मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या चौहट्टा बाजार येथील ‘गुटखा किंग’ नदीम शाह रेहमान शाह याला गुटख्याची तस्करी करताना दहिहांडा पोलिसांनी अखेर गजाआड केले. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी ही कारवाई केली.

सविस्तर माहितीनुसार, दहीहंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास गस्त घालताना सदर ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस कर्मचारी व पंचाचे मदतीने नाकाबंदी करून धाड टाकली असता नदीम शाह रेहमान शाह यांच्या कब्जातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा/पान,मसाला अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. विशेष म्हणजे नदीम शाह रेहमान शाह हा मागील अनेक वर्षापासून चौहट्टा बाजार परिसरात गुटख्याची अवैध विक्री करत होता. गत तीन वर्षापासून दहीहंडा पोलिसांना चकमा देत पसार होत होता. मात्र आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास टाकळी रस्त्याने हा इसम आपल्या चारचाकी महिंद्रा एक्सयुव्ही पांढऱ्या रंगाची गाडी क्र MH 02 CP 0600 ने येत असल्याचे निदर्शनास आले. दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे आणि कर्मचारी आधीच सापळा लावून होते.

सदर इसमाने गाडी त्याच्या घरासमोर थांबवताच पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता वाह पान मसाला चे 128 पाकीट असे एकूण किं 15,360/-रू, डब्ल्यू चेविंग तंबाखूचे 128 पाकीट किं 3,840/- रु, विमल पान मसाला 22 पाकीट किं 4,356/-रु, निळी पान बहार 25 पाकीट किं 5625/- रु, व्ही वन तंबाखू 150 पाकीट किं एकूण 4,500/- रु, विमल पान मसाला मोठी 50 पॅकेट किं एकूण 9,350/- रु, केसर युक्त विमल पान मसाला लहान 100 पाकीट एकूण 15,000/- रु, काली बहार पान मसाला 40 पाकीट किं एकूण 5,200/- रु, बी एच आर खानदानी तंबाखू 40 पाकीट एकूण किं 1200/- रु, महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी क्र MH 02 CP 0600 अंदाजे किंमत 7,00,000 रुपये असा एकूण 7,64,431/- रू चा मुद्देमाल हस्तगत केला. या विरोधात फिर्यादी म्हणुन स्वतः ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी अप नं 206/2024 कलम 328,188,272,273 भादवी 26(2)(iv),27(3)(D),27(3)(E),30(2)(A) अन्नसुरक्षा मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करत नदीम शाह रेहमान शहा याला गजाआड केले. दाखल अधिकारी पोहेका विजयसिंह चव्हाण असून याप्रकरणी पुढील तपास सपोनि पुरुषोत्तम ठाकरे करीत आहेत. या संपुर्ण कारवाईत ठाणेदार पुरूषोत्तम ठाकरे, ना.पो.शि.प्रविण पेटे, पो.शि.दिंडोकार, पो.ह.गोपाल अघडते, पो.ना.मनिष वाकोडे, पो.शि.रामेश्वर भगत, पो.ह.अनिलभांडे यांनी सहभाग घेतला होता.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: