Monday, December 23, 2024
Homeराजकीयपेठ नाका ते सांगली राष्ट्रीय महामार्गा चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याने पालकमंत्री डॉ....

पेठ नाका ते सांगली राष्ट्रीय महामार्गा चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार…

सांगली – ज्योती मोरे

पेठ नाका ते सांगली राष्ट्रीय महामार्गावरचे चौपदरीकरण करण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने पालक मंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार मिरजेत सांगली जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजपचे पदाधिकारी म्हणाले, सांगली शहरातून पुणे मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अत्यंत व्यस्त रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे पेठ नाका ते सांगली पर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी होती. राष्ट्रीय महामार्ग पेठ नाका त वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी व त्यामुळे होणारी नागरिकांचे हाल याबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना मंत्री खाडे यांनी अवगत केले.

नागरिकांची अनेक वर्षापासूनची या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी असून यावेळी चौपदरीकरणाबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात बाबत संबंधित प्रशासनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश देवून. 611.60 कोटी इतका निधी मंजूर करून सदर कामाची निविदा तात्काळ प्रसिध्द करण्यात आली.

या चौपदरीकरणाने वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असून या सोबतच मुंबई-पुणे या शहराला जाण्यासाठीच्या प्रवासाला कमीत कमी वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे. यामुळे शेती व शेतमाल वेळेवर पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्ग व नागरीकांची सोय होणार आहे. संदर्भात होणाऱ्या दळणवळण व वाहतुक करणाऱ्या नागरिकांना लाभ होईल पेठ नाका ते सांगली पर्यंतच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. हा प्रश्न त्वरित सोडवल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर कडेगाव चे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, रमेश शेंडगे, भगवान साळुंखे, दिनकर पाटील, नितीन शिंदे, रवींद्र आरळी, संग्राम देशमुख, राजाराम गरुड, सुरेंद्र चौगुले, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, मिलिंद कोरे, स्वप्निल पाटील, निशिकांत पाटील, शेखर इनामदार, नीता ताई केळकर, पृथ्वीराज पवार, भारतीताई दिगडे, स्वातीताई शिंदे, धीरज सूर्यवंशी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे, प्रकाश ढंग उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सत्कार करताना भाजपचे पदाधिकारी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: