सांगली – ज्योती मोरे.
काढणीला आलेल्या बागेची काढणी सुरू होणार एवढ्यात अवकाळीने धूळधाण केली. काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने ग्रासलेल्या तरुण शेतकर्याने आत्महत्या करण्याचा प्रकार कोंगनोळी ता. कवठेमहांकाळ येथे घडला.
सोमवारी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केली. मुख्यमंत्री सहायता निधी व मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून कुटुंबाची व्यथा मांडून जास्तीत जास्त मदत कसे करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी दिली.
गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडली होती. जिल्ह्यात ४ हजार १८५ हे. क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यातील आगाप द्राक्ष बागांची धूळधाण झाली आहे. अवकाळी पावसामुळे होणार्या नुकसांचे पंचनामे शासनाकडून सुरू केले आहे.
यामध्ये सर्वात जास्त नुकसान द्राक्ष पिकाचे झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यात पोटरीला आलेले ज्वारीचे पिकही भुईसपाट झाले आहे. तर पावसाने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीही अशक्य झाल्याने नुकसानीत वाढ झाले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांशी समक्ष भेटून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती महेंद्रभाऊ चंडाळे यांनी दिली.