Wednesday, November 6, 2024
Homeगुन्हेगारीसांगली कोर्टासमोरील गोविंद प्लाझा ही इमारत धोकादायक - प्रकाश चव्हाण व मीना...

सांगली कोर्टासमोरील गोविंद प्लाझा ही इमारत धोकादायक – प्रकाश चव्हाण व मीना तांदळे यांचा आरोप…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील वानलेसवाडी परिसरात कोर्टासमोर नैसर्गिक नाल्यावर अनाधिकृतपणे नाल्याची रुंदी कमी करत, त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून, ओपन स्पेस वर अतिक्रमण करत तसेच अनेक वर्षांपासून असलेली विहीर बुजवून त्या विहिरीवरच अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेली गोविंद प्लाझा ही बहुमजली इमारत धोकादायक असून ती या इमारतीमधील व्यवसायिकांसह,याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकते.

असा आरोप प्रकाश चव्हाण आणि मीना तांदळे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय.दरम्यान सदर नाल्याची रुंदी 35 ते 40 फूट असताना सध्या या ठिकाणी आठ ते दहा फूट इतकीच ती शिल्लक आहे. पावसाळ्यात कुपवाड पासून येणारे पाणी या ठिकाणी कमी रुंदीमुळे फुगून नागरी वस्तीत शिरते.त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत होते. हा नाला वळवण्याची परवानगी कोणी आणि का दिली? सदर बांधकामासाठी प्रमाणपत्र कसे देण्यात आले? याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पुन्हा एकदा महानगरपालिकेचा दुर्लक्षित आणि गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. या व्यवहारात बिल्डरला पाठीशी घालण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. सदर बिल्डरच्या बाबतीत तक्रार करूनही कोणीही दाद घेत नाही.परंतु येत्या तीन महिन्यांत बिल्डरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तसेच या विरोधात हरित न्यायालयात दाद मागितल्याचे व सदर न्यायालयाने संबंधित बिल्डरला नोटीस पाठवल्याचेही प्रकाश चव्हाण आणि मीना तांदळे यांनी यावेळी बोलताना सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: