Sunday, December 22, 2024
Homeराजकीयआमदार फोडण्याकरिता पैशांची वारेमाप उधळण करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांना मदत आणि युवकांच्या रोजगाराकरिता...

आमदार फोडण्याकरिता पैशांची वारेमाप उधळण करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांना मदत आणि युवकांच्या रोजगाराकरिता निधी देण्याची कुवत नाही – विजय वडेट्टीवार…

आकोट – संजय आठवले

विरोधी पक्षांमधील आमदारांना फोडून आपल्याकडे वळते करण्याकरिता पैशांची वारेमाप उधळण करणाऱ्या राज्यातील युती शासनाकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मदत व बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची धमक नाही. केवळ सत्तेकरिता सर्व संवैधानिक नीतीमूल्ये पायदळी तुडविण्याचा एकमेव अजेंडा हे सरकार चालवीत आहे.

परंतु त्यांच्या ह्या अघोरी कृत्यांना नष्ट करण्याचा विडा काँग्रेसने उचलला असून त्या सत्कार्यात या राज्यातील तमाम जनतेने सहकार्य करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी आकोट येथे केले.

संपूर्ण देशात काँग्रेसचे मजबुतीकरण करण्याचे प्रक्रियेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे संपूर्ण राज्यभर जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आकोट येथे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदायाला राज्याचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार हे संबोधित होते. राज्य शासनाच्या आमदार फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला.

ते म्हणाले की, राज्यातील वर्तमान सरकार विरोधी पक्षातील आमदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्याकरिता वारेमाप पैशांची उधळण करीत आहे. मात्र राज्यातील शेतकरी अस्मानी संकटांनी अगदी घायकुतीला आला असतानाही या सरकारकडे त्याच्या मदतीकरिता एक छदामही नाही.

बेरोजगारीवर बोलताना ते म्हणाले की, या सरकारने राज्यातील युवकांचे हाताला काम देण्याऐवजी त्यांचे हाती जिओ मोबाईल देऊन त्यांना आपल्या बेरोजगारीची जाणीवच होऊ न देण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.

युवकांना असे मोबाईल मध्ये गुंतवून दुसरीकडे राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळून नेण्याचा एकमेव उद्योग हे शासन करीत आहे. अशाप्रकारे राज्यातील सारे उद्योग न्यायचे गुजरातच्या दारी, आणि लोकांना मात्र म्हणायचं शासन आपल्या दारी.

ते आणखी म्हणाले की, रोजगारा बाबत हे शासन लोकांना असे फसवीत आहे. तर दुसरीकडे अधिकारांबाबत शांततेच्या मार्गाने कुणी आंदोलन करीत असतील तर त्यांच्यावर अमानुष लाठी हल्ला चढवित आहे. हे शासन पूर्णत: संवेदनाहीन झालेले आहे.

गत विरोधी पक्ष नेत्यांच्या फुटण्याचा उल्लेख करून वडेट्टीवार म्हणाले की, आमचे कमजोर विरोधी पक्षनेते या सरकारने फोडले. परंतु आता आपण विरोधी पक्षनेता आहोत. आपल्या कारकिर्दीत विद्यमान शासनाची तिरडीच उचलली जाईल. मात्र हे करण्याकरिता जनतेने महात्मा गांधी यांच्या मार्गाने जाणाऱ्या काँग्रेसला समर्थ साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार नातीकोद्दिन खतिब, माजी मंत्री रामदास बोडखे, माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार, श्याम उमाळकर, माजी आमदार बबनराव चौधरी, म प्र कामगार सेल अध्यक्ष महंमद बद्रुज्जमा, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चोरे, हेमंत देशमुख,

कृउबास सभापती प्रशांत पाचडे, पर्यावरण सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे, ॲडवोकेट महेश गणगणे, संजय बोडखे, जिल्हा युकाँ अध्यक्ष निनाद मानकर हे उपस्थित होते. ह्या वेळी माजी मंत्री रामदास बोडखे, माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, ॲडवोकेट महेश गणगणे, संजय बोडखे,प्रशांत पाचडे, संजय आठवले यांनीही मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुकुंद पांडे यांनी केले.

ही जनसंवाद यात्रा यशस्वी करण्याकरिता आकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष अनोख राहणे, शहराध्यक्ष सारंग मालानी, सुनील गावंडे, सतीश हाडोळे, रतन गुजर, दीपक वर्मा, नंदकिशोर शेगोकार, संजय बोरोडे, अफजल खान, प्रतीक गोरे, अनिकेत कुलट, शिवराम डिक्कर, रोशन चिंचोळकर, मिलिंद नितोने, जावेद पटेल, इमरान पटेल, गजानन डाफे, घनश्याम बिजने,

विकास देशमुख, हाफिज खान, अझहर शेख, जुबेर पठाण, फारुक अली, जमील भाई, गजानन आखरे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ. कविता राहणे, शहराध्यक्ष मंगला नवलकर, नीता मेतकर, शारदा वरठी, राधा मोहोड, योगिता वाकोडे, पद्मा गायगोले, शोभा वाघमारे, जयश्री गावंडे, वैभव पाचडे, मुकुंद पांडे, चेतन रूपालीया, सुनील अंबळकार,

मयूर निमकर, माजी नगरसेवक विलास घाटोळ, शिवदास शिवदास सावरकर, प्रफुल्ल पिंपळे, ॲडवोकेट विकास पिंपळे, ज्ञानेश्वर बोरोडे, गोपाल वानखडे, बाळासाहेब इंगळे, डी ओ म्हैसणे, जयेश राजदे, नागेश इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: