Sunday, September 8, 2024
spot_img
Homeकृषीअवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना शासनाने भरघोस नुकसान भरपाई...

अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना शासनाने भरघोस नुकसान भरपाई द्यावी…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नरखेड तालुका पदाधिकाऱ्यांची मागणी…

नरखेड – अतुल दंढारे

गेल्या आठवड्या पासून नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट तुटून पडलेले आहे. अवकाळी पाऊस, वारा आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा व मोसंबी या पिकांचे तसेच मिश्र पीक गहू, चना आणि मका याच प्रमाणे बागायत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे सुद्धा भरपूर नुकसान झाले आहे.

आधीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे आणि शेतीला लागणारे अवजारे, रासायनिक खते व कीटकनाशके याचे बाजारभाव गगनचुंबी झाले आहेत. या सर्व बाबींमुळे शेतकरी हवालदिल झाला असून तो आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री वैभव दळवी आणि नरखेड शहर अध्यक्ष श्री संजय चरडे व उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी नरखेड चे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देवून मत व्यक्त केले.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुरेशजी आरघोडे, श्री राजू जाऊलकर, श्री मेहमूद शेख, श्री उदयन बनसोड, प्रा. श्री नरेश तवले, श्री दिनेशजी खत्री, श्रीरामजी जोंधळकर, श्री प्रकाशजी झाडे, श्री ईश्वर रेवतकर तसेच इतर सर्व राष्ट्रवादी (काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: