नरखेड – अतुल दंढारे
काटोल तालुक्यातील हरदोली गणेशपुर येथे सध्या अस्तित्वात असलेली शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे यांनी केली आहे.
संबंधित आदीवासी विभागाकडे काटोल पंचायत समिती द्वारे घेतलेल्या ठरावाच्या प्रती पाठविण्यात आलेल्या आहे. काटोल तालुक्यातील मधील मौजा गणेशपुर येथील आदीवासी आश्रम शाळा नागपूर ,वर्धा, भंडारा या जिल्ह्यातील एकमेव मुलींची शाळा असून या परिसरातील 70_ 80 गावातील गोरगरीब आदिवासी मुलींना शिक्षणाची सुविधा स्टारफंड सहित या शाळेत उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण चालू राहण्यासाठी या भागांमध्ये आदिवासींच्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाची सोय होणे फार आवश्यक आहे.
ही एकमेव अशी शाळा आहे की 35 ते 40 किमीच्या आत कुठलीही अशी शासकीय अनुदानित आश्रम शाळा आदिवासींची नाही. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी संविधानाच्या सूची क्रमांक 45 नुसार राज्य शासनाने दुर्गम व डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी असे अनेक उपक्रम राबवले जरी असले तरी शिक्षणाकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
तेव्हा त्या भागामध्ये शिक्षणाची सोय व्हावी जिथे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षणाची सोय आहे तिथे अकरावी आणि बारावी कला विज्ञान शाखा सुरू कराव्या अशी मागणी काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे या सोबतच या भागातील ग्राम पंचायतीनी ठरावा द्वारे शासनाकडे मागणी केली आहे.
वरिष्ठ आदिवासी विकास नागपूर यांच्या अधिकाऱ्यांनी तथा संबंधित मंत्र्यांनी यावर विचार करून गणेशपुर येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची पुढील शैक्षणिक सत्रापासून मान्यता द्यावी व शिक्षणाची सोय उपलब्ध करावी अशी मागणी परिसरातील आदिवासी जनतेची आणि विद्यार्थ्यांची असून अशी मागनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.