Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यकोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट चोरीला…वाडेगाव येथील घटना…

कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट चोरीला…वाडेगाव येथील घटना…

वाडेगाव येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट चोरीला गेल्याची माहिती समोर येत असुन त्या बाबतीत नागरिकांमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत येथील निर्गुणा नदीच्या पात्रात गावापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट चोरीला गेले आहेत बंधाऱ्यात जेव्हा जेव्हा पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले तेव्हा तेव्हा पाणी पातळी वाढत असल्याने वाडेगाव सह परिसरातील गावकऱ्यांना कोल्हापूरी बंधारा वरदान ठरला आहे.

परंतु या वर्षी मात्र मुळात कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याचे काम विलंबाने हाती घेतले त्यामुळे बंधाऱ्यात किती प्रमाणात पाणी अडविले जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण सध्याच्या परिस्थितीत नदीचा प्रवाह कमी झाला असल्याचे चित्र आहे तसेच बंधाऱ्याचे गेट चोरीला गेल्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडविण्या संदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात गावात भिषण पाणी टंचाई चे संकेत मिळत आहेत तसेच परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात होणारा फायदा या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांना फायदा सुध्दा होनार नसल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याची जबाबदारी असलेल्या लघु पाटबंधारे विभागा बाबतीत नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट चोरीला जाणे ही खेद जनक बाब आहे बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले आहे. रुपाली अंकुश शहाणे सरपंच वाडेगाव कोल्हापूरी बंधाऱ्यात शंभर टक्के पाणी अडविले असता भरपूर फायदा होतो परंतु बंधाऱ्याचे गेट चोरीला जाणे हे संगनमताने नियोजित कट असल्याचा अंदाज आहे.

मो. अफ्तार मो. युसुफ. माजी प.स. सदस्य

बंधाऱ्याचे गेट चोरीला गेल्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडविण्या संदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात गावात भिषण पाणी टंचाई चे संकेत मिळत आहेत.

सुनील मानकर, भाजप ता. उपाध्यक्ष

कोल्हापूरी बंधाऱ्यावर असलेले जुने गेट व कार्यालयात नोंद असलेल्या गेट ची संख्या पाहिल्यावर नक्की किती गेट चोरीला गेले हे निश्चितच होईल व त्यानुसार पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात येईल.

मनिष पाटील, अभियंता लघु पाटबंधारे विभाग

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: