Monday, December 23, 2024
Homeराज्यसराफा व्यापाऱ्याच्या डोळयात मिरचीपुड टाकुन सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये लुटणारी...

सराफा व्यापाऱ्याच्या डोळयात मिरचीपुड टाकुन सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह ताब्यात…

नांदेड – महेंद्र गायकवाड

किनवट तालुक्यातील बोधडी येथील एका सराफा व्यापाऱ्यास लुटल्या प्रकरणी दोन महिन्यापूर्वी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 18.30 वाजता फिर्यादी हा त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे असलेली बॅग घेवुन घराकडे जात असतांना त्यास बोधडी गावचे रेल्वे अंडर ब्रिज येथे फ डोळयात मिरचीपुड टाकुन त्याचे जवळील सोने, चांदीचे दागीने व नगदी असे एकुण 7,58,655/- रुपयाचा माल जबरीने चोरुन नेले वरुन पो.स्टे. किनवट येथे गुरनं 20/2024 कलम 392, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाच्या आरोपीचे शोध करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोउपनि आनंद बिचेवार यांची एक टिम नेमण्यात आली होती.

सदर टिमने मौजे बोधडी गावात भेट देवून तेथील माहीतगार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेवुन गोपणीय माहितगार नेमुण गोपणीय माहिती घेतली असता माहिती मिळाली की, संशईत इसम नामे किशोर ऊर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्या पासुन फरार होता.

त्यावरुन त्याचा शोध घेतला असता दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रात्री तो रेल्वेस्टेशन नांदेड परीसरात आल्याची माहिती पोउपनि बिचेवार यांचे टिमला मिळाली त्यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेवुन गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की त्याचा मित्र बाबुराव त्र्यंबक शहाणे रा. बोधडी याने त्याचा भाऊ दत्ता शहाणे याने बाबुराव शहाणे यांचे दुकाणाचे बाजुला सराफा दुकाण टाकल्याने त्याचा मनात राग होता.

सदर दत्ता शहाणे याचा जाण्याचे व येण्याचे मार्गाची रेकी करुन त्याचे जवळील सोने-चांदीचे बॅग लुटण्याचा आरोपी किशोर ऊर्फ बारक्या व बाबुराव शहाणे यांनी कटरचुन आरोपी नामे 1.. संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड, 2. दिलीप व्यंकटी मेटकर रा. वडारगल्ली मुदखेड याचे मदतीन सदरची जबरी चोरी केली असल्याचे कबुली दिली.

त्यावरुन आरोपी नामे 1. किशोर ऊर्फ बारक्या पि.तानाजी सोळंके वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. अकोली ता.उमरखेड जि. यवतमाळ ह.मु. आबादी बोधडी, 2. संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड, 3. बाबुराव त्र्यंबक शहाणे वय 49 वर्षे व्यवसाय व्यापार रा. शास्त्रीनगर बोधडी ता. किनवट यांचा शोध घेवुन त्यांचे कडुन सोन्या व चांदीचे दागीने किंमती 6,23,015/-रुपयाचे व नगदी रुपये 30,000/-असा एकुण 6,53,015/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व दिलीप व्यंकटी मेटकर रा. मुदखेड याचा शोध घेतला पण तो मिळुन आला नाही त्याचा शोध चालु आहे. वरील तिन आरोपी यांना पो.स्टे. किनवट येथे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस. अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, तानाजी येळगे, महेश बडगु, मारोती मोरे, गजानन बयनवाड, उदयसिंग राठोड, संजिव जिंकलवाड, चालक मारोती मुंडे, कलीम शेख यांनी पार पाडली.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: