खामगांव – हेमंत जाधव
आज दिनांक 1/11/2023 वार बुधवार रोजी सकल मराठा समाज खामगांवच्या अमरण व साखळी उपोषणाचा चवथा दिवस सुरु आहे व मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या दुसऱ्यांदा सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला असुन आणि अजून ही शासन प्रशासन हे मराठा आरक्षणा संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस कारवाही करताना दिसून येत नाही आहे.
हे शासन प्रशासन फक्त आणि फक्त वेळ काढू काम करीत आहे म्हणजेच मराठा समाज बांधवांची व जरांगे पाटलांची दिशा भुल करीत आहे या मुळे सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने आज सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाहीर आवाहन आले आहे की जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत खामगांव शहरा मध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम अथवा सभा घेण्यात येवू नये आपण मराठा समाज बांधवांच्या भावनांचा आदर करावा जर कोणत्याही राजकिय पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केल्या गेल्यासत् त्या पक्षाचा मराठा समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध केला जाईल असे आवाहन सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने करण्यात आले आहे व या आशयाचे डिजिटल फ्लेक्स बोर्ड सुद्धा उपोषण मंडपा समोर लावण्यात आले आहे.