Sunday, December 22, 2024
Homeराज्यवनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा उग्र आंदोलन करू - सभापती...

वनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा उग्र आंदोलन करू – सभापती सचिन किरपान…

रामटेक – राजु कापसे

जिल्ह्यातील रामटेक तालुका व पारशिवनी तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचा घटना मागील काही महिन्यापासून सतत सुरु आहे. त्यात 10 ते 12 शेतकऱ्यांचा व शेकडो जनावरांचे मृत्यू झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरु केली आहे.

पण वाघांना जेरबंद करणे हा खात्रीलायक उपाय आहे का ? असा प्रश्न रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय शेती व जंगलात तेंदुपत्ता जमा करने, जडी – बुटी, मोह फुल वेचने, दूध संकलन करने यावर यांचा परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे.

परंतु गेल्या काही महिन्या पासून रामटेक तालुका व पारशिवनी तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांचा वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा लागत आहे शेतात धान पिकांचा हंगाम सुरु होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन गायी-म्हशी आहेत त्यांचा चाऱ्यासाठी शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. जंगलालगतचा गावामध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

ही दहशत एवढी आहे की जंगललगतचा गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही वाघाचा हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर शाषनकडून त्याचा कुटुंबियांना 25 लाख रुपयाची मदत मिळते. एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का ? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का ? जर पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा लोकवर्गणीतुन आम्ही 25 नाही 50 लाख रुपये देऊ.

वनविभाग पर्यटनाचा नावावर निधी जमा करतो. त्या निधीतून अनेक लोकहिताची कामे केली गेली पाहिजे. त्यांना जो नफा मिळत आहे त्यात CSR फंडा अंतर्गत प्रत्येक जंगलालगतचा गावामध्ये 50 लाख रुपयाची विविध विकासकामे केली गेली पाहिजे. ज्यांचा जीव वाघाचा हल्ल्यात जात आहे त्या पीडिताचा परिवाराला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शिवाय त्या कुटुंबातील एका व्यक्तीला पात्रतेनुसार शासकीय नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे.

अलीकडे वाघाचे हल्ले वाढले आहे. गावातील शेतकरी भयभीत जीवन जगत आहे. शासनाने व प्रशासनाने आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. शासनाने यावर वनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा व उपाय योजना करावी अन्यता शासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल हा आंदोलन रुद्र स्वरूपाचा राहील असा ही इशारा सभापती सचिन कीरपान यांनी केला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: