Friday, November 22, 2024
Homeराजकीयआदिवासी बहुल देवलापार क्षेत्रात वण्याप्रान्यांचा हल्याचा हैदोस, जंगली प्राण्यांचे वनविभागाने योग्य नियोजन...

आदिवासी बहुल देवलापार क्षेत्रात वण्याप्रान्यांचा हल्याचा हैदोस, जंगली प्राण्यांचे वनविभागाने योग्य नियोजन करावे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी भेटून निवेदांद्वारे केली मागणी…

रामटेक – राजु कापसे

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले असता पेंच बाह्यप्रकल्पातील देवलापार परिसरात नेहमी वण्याप्राणांचे हल्ले होत आहेत.यात स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.यामुळे या भागातील नागरिकांत वन्य प्राण्यांची दहशत तयार झाली आहे.

पेंच बह्यप्रकल्पातील वन्यजीव गावाजवळ येत असल्यामुळे वन विभागाने शेताला तारेची कुंपण, ड्रोन सायलेन्सर लावणे, वनपरिक्षेत्राला तारेचे कुंपण लावणे, वन्यजीवाच्याहल्यात मृत्यू झालेल्या परिवाराला वन विभागाकडून एक कोटी रुपयांची मदत मिळावी अशी मागणी घेऊन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.वण्यजिवांच्या हल्ले,स्थानिक नागरिकांत असलेल्या दहशतीवर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: