राहुल मेस्त्री…
कर्नाटक राज्य रयत संघटनेची निपाणी येथे नुकतीच बैठक संपन्न झाली असुन दर जाहीर न करता कारखाने सुरू केल्यास बंद पाडू असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. ते मंगळवार दि.३०रोजी येथील शासकीय विश्रामधामात आयोजित रयत संघटनेच्या बैठकीत बोलत होते.ते बोलताना पुढे म्हणाले दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात.
यावेळी सर्वच शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची घोषणा केली जाते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसून तुटपूंजा दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी एफ आर पी शिवाय जादा ५०० रुपये दर जाहीर न करता कारखाने सुरू झाल्यास ते कारखाने बंद पाडू .त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी व बिगर ऊस उत्पादक शेतकरी हे कारखान्याचे भाग भांडवल धारक आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी १०० किलो साखर देणे बंधनकारक आहे. तरीही शेतकऱ्यांना अल्पप्रमाणात साखर देऊन बोळवण केली जात आहे. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांना निवेदन दिले आहेत.
पण आज पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही प्रकारचे निवेदन न देता थेट रस्त्यावर उतरून आसूड मोर्चा आणि उसाचा दांडका घेऊन आंदोलन केले जाणार आहे.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसह इतर भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आज तागायत त्याचा सर्वे झालेला नाही.
त्यामुळे तात्काळ निपक्षपती पणे सर्वे करून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असे ते म्हणाले.याप्रसंगी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष रमेश पाटील,उमेश भारमल ,कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे एच.बी. ढवणे, बाळू पाटील, बापूसाहेब पाटील, सर्जेराव हेगडे, मैनू शेख, राजू शेख, सुभाष देवर्षी यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.