अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला असून तो मिटविण्यासाठी आज दोघांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी बोलावलं आहे, त्याआधीच बच्चु कडू यांनी आपली भूमिका मांडत,कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या लढाईच्या असल्याचे म्हटले आहे.
रवी राणा व बच्चू कडू वाद हा शिगेला पोहचला असतांना आज या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मी मुंबई ला संध्याकाळी आठ वाजता निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलले आहे. मला असं वाटते आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, तर ठीक त्याने जे काही आरोप केले त्या संदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा समाधान झाले तर एक तारखेचा विचार करू आणि जे बदनामी केली आहे. ते वापस द्यावी विषय संपला अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
रवी राणा यांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांच्याकडून थेट राज्य सरकारलाच इशारा देण्यात आला होता. रवी राणा यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. तसेच आपल्यासोबत सात ते आठ आमदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आता या वादाची दखल घेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांची समजूत काढण्यात किती यशस्वी होतात हे लवकरच कळेल.