खामगाव – हेमंत जाधव
खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यांनंतर संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ना अतिवृष्टीची मदत मिळाली ना खरडून गेल्याची मदत मिळाली अशात रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कहर मांडला शासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर करून कवठळ मंडळाला 21 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड या निकशातून बाद करून सदृश कोरडा दुष्काळ जाहीर केला. आणि यामुळे पीकविमा कंपनीने 25% विमा परतावा मिळण्यापासून कवठळ मंडळाला डावलले.
तालुक्यात सगळीकडे समान परिस्थिती असताना उर्वरित 3 मंडळांना 25% विमा परतावा जाहीर होतो आणि कवठळ मंडळाला हेतुपुरस्सर डावलण्यात येते हे कशामुळे? असा सवाल शेतकऱ्यांनी केला. निवेदन देताना कवठळ महसूल मंडळातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.