Monday, January 6, 2025
Homeराज्यगडमंदीरावरील प्रसिद्ध "काकड आरती" १८ ऑक्टोंबर पासुन प्रारंभ...

गडमंदीरावरील प्रसिद्ध “काकड आरती” १८ ऑक्टोंबर पासुन प्रारंभ…

पहाटेच्या आरतीला असते हजारो भावीकांची गर्दी…
” जय श्रीराम ” च्या जयघोषाने निनादते संपुर्ण रामगड परीसर…

रामटेक – राजु कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा दुरवर ख्यातनाम असलेल्या रामनगरीतील गडमंदीरावरील श्रीराम मंदीरामध्ये उद्या शुक्रवार दि. १८ ऑक्टों.पासुन काकड आरती सुरू होत असुन तब्बल महीनाभर गडमंदीरावर भावीकांची मांदीयाळी असणार आहे. या दरम्यान महीनाभर पहाटेच्या सुमारास संपुर्ण गडमंदीर परिसर रामनामाच्या जयघोषाने, गजराने दुमदुमुन जात असतो हे तेवढेच विशेष.

भोसला देवस्थान गडमंदीर रामटेक कडुन मिळालेल्या माहितीनुसार, काकड आरती शुक्रवार दि. १८ ऑक्टों. पासुन प्रारंभ होत असुन त्रिपुरी पोर्णिमेला समाप्ती होणार आहे. गडमंदीरावर काकड आरती ही गेल्या कित्येक वर्षापासुन पारंपरीक पद्धतीने सुरू असुन याचे संपुर्ण आयोजन हे भोसला देवस्थान गडमंदीर, रामटेक च्या वतीने करण्यात येत असते. दरम्यान पहाटे ३ वाजता पासुनच गडमंदीरावर भाविकांची रेलचेल सुरू होत असते.

या निमित्याने रामधून दिंडी विठ्ठल मंदिरापासून दररोज पहाटे ठीक ४ .३० वाजता निघणार आहे. पहाटे ३ वाजता पासुनच श्रीराम मंदीरामध्ये भक्तगण हजेरी लावतात व भजनाचा कार्यक्रम करतात. यानंतर पहाटे ५ च्या सुमारास काकड आरती होत असते. या दरम्यान तेथे जवळपास ४ ते ५ हजार भावीक काकड आरतीचा लाभ घेण्यासाठी हजर असतात. यामध्ये लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील भावीकांचा समावेश असतो.

तेव्हा पहाटेच्या सुमारास एवढ्या मोठ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भोसला देवस्थान गडमंदीर, रामटेक व पोलीसांकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. यादरम्यान रिसीव्हर, भोसला देवस्थान यांचे मार्गदर्शनाखाली गडमंदीर येथील निरीक्षक अधिकारी हे आपल्या सुरक्षा कर्मचारी तथा काही पोलीसांना हाताशी घेवुन तब्बल महीनाभर सुरक्षा व शांततेची व तसेच नियोजनबद्ध कार्यप्रणालीची मोलाची कामगिरी पार पाडत असतात.

त्याचप्रमाणे पहाटेची काकड आरती आटोपल्यानंतर गडमंदीरावर काही भक्तगण भावीकांसाठी प्रसादाची व्यवस्था करीत असतात. एकुणच काकड आरती दरम्यान महीनाभर संपुर्ण रामनगरीमध्ये एक वेगळेच भक्तीमय वातावरण पहावयास मिळत असते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: