Saturday, December 21, 2024
Homeराज्यकृषी उत्पन्न बाजार समितीचा 'प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा' थाटात संपन्न...

कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा’ थाटात संपन्न…

प्रवेशद्वार उद्घाटनासह विविध विकासकामांचे भुमीपुजनही उरकले

रामटेक – राजू कापसे

सभापती सचिन किरपान यांच्या कुशल नेतृत्वाच्या बलबुत्यावर विकासाच्या वाटेने अल्पावधीतच मार्गस्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक च्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन काल दि. १८ ऑगस्ट ला माजी राज्यमंत्री सुनील केदार, खासदार शाम बर्वे तथा जी.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते पार पडले.

यासोबतच याच दिवशी बाजार समितीतील जवळपास आठ ते नऊ विकासकामांचे भुमीपुजनही करण्यात आले. यावेळी प्रमुख्याने पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, उबाठा चे विशाल बरबटे, माजी खासदार प्रकाश जाधव, देवेंद्र गोडबोले, सभापती सचिन किरपान आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते. बांधकाम गतीने तथा सुयोग्यरित्या करण्यात आले पाहिजे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपाल हे दिवस-रात्र येथे रोपून राहत होते नुकतेच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले व काल दिनांक दि. १८ ऑगस्टला दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक च्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री सुनील केदार, खासदार श्याम बर्वे तथा जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकोड्डे यांच्या हस्ते पार पडले.

यानंतर लगेचच हमाल भवन, शेतकरी भवन यांचेसह सात ते आठ विकासकामांचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान येथे उपस्थित व्हॉईस ऑफ मीडिया शाखा रामटेक पत्रकार संघाकडूनही खासदार श्याम बर्वे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरू झाला त्यात खासदार श्याम बर्वे यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार साहेबांचा आशिर्वाद आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला निधीची कधीही कमी पडू देणार नाही असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

तसेच माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी सभापती सचिन किरपान यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीची स्तुती करून त्यांचेवर कौतुकांचा वर्षाव केला. पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी सुद्धा सभापती किरपान यांचे कौतुक करून येथे तयार करण्यात येणार असलेल्या शेतकरी भवन तथा हमाल भवन येथे जेवणाची व्यवस्था करावी तथा ती निशुल्क किंवा कमी दरात सुविधा करावी असे सभापती किरपान यांना सांगितले. यानंतर येथे माजी खासदार प्रकाश जाधव उभाटाचे विशाल बरबटे, देवेंद्र गोडबोले यांची भाषणे होऊन कार्यक्रम संपुष्टात आला.

कार्यक्रमाचे संचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विरेश आष्टणकर, प्रास्ताविक त्रिलोक मेहर तथा आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंता महाजन यांनी माणले. यावेळी उपस्थितांमध्ये श्रीमती शांताताई कुमरे (सदस्य जी.प. नागपूर), श्री. स्वप्नील श्रावणकर (सभापती पं.स. मौदा), श्री. नरेशजी बर्वे, श्री. सुनिलजी रावत, श्री. बबनजी झाडे, सौ. कलाताई ठाकरे (पं.स. सदस्य रामटेक), सौ. अस्मिता बिरणवार (पं.स. सदस्य रामटेक), श्री. पी.टी. रघुवंशी, श्री. नितीनजी भैसारे (कार्याध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी),

श्री. विरु गजभिये, श्री. निखिल पाटील, सौ. लक्ष्मीताई कुमरे (उपसभापती कृ.उ.बा. स. रामटेक), संचालक श्री. विरेश आष्टणकर, श्री. त्रिलोक मेहर, श्री. रामुजी झाडे, श्री. यशवंत भलावी, श्री. झनकलाल मरस्कोल्हे, श्री. नरेश मोहने, श्रीमति साबेराताई पठाण, श्री. नीलकंठ महाजन, श्री. नकुल बरबटे, श्री. उमेश भांडारकर, श्री. योगेश माथरे, श्री. बाबुजी वरखडे, श्री. भीमराव आंबीलढुके, श्री. विजय मदनकर, श्री. शंकर तांदुळकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: