दर वर्षी खांमगाव प्रेस क्लब तर्फे दिल्या जाणारा मानाचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा कामगार चळवळीतील नेते कॉम्रेड सी.एन.देशमुख यांना जाहीर झाला आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन चे महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्र् स्टेट इलक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे राज्याचे वर्कींग अद्यक्ष अखिल भारतीय इलक्ट्रिसिटी एम्प्लॉइज खजिनदार अशा महत्वपूर्ण पदावर कार्यरत असलेले सी एन देशमुख खऱ्या अर्थाने कामगार चळवळीतील रत्न आहेत म्हणून खामगाव चे ते रत्न ठरले आहेत.
29-7-62रोजी जन्मलेले चंद्रकांत पुढे आय टी आय मध्ये विजतंत्रि चा अभासक्रम पूर्ण करून महाराष्ट्र इलक्ट्रीसिटी बोर्ड मध्ये त्यांनी ज्युनियर ऑपरेटर ची नौकरी स्वीकारली आणि येथून सी एन यांचा कामगार चळवळीचा प्रवास सुरु झाला आधीच डाव्या विचारसरणी चे असल्याने ही चळवळ त्यांनी अनेक आंदोलने करून पुढे नेली व कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आजही त्यांचे हे कार्य एखाद्या निखाऱ्या प्रमाणे अविरत पणे सुरू आहे या प्रवासात सी एन यांना कॉ .ए बी वर्धन ,कॉ दत्ताजी देशमुख,कॉ शाम केलकर,कॉ गोविंद पानसरे ,कॉ मनोहर देशकर,
कॉ सोनोने, दासगुप्ता,कॉ कानगो,कॉ मोहन शर्मा ,कॉ उके ,कॉ जाधव आदी मान्यवरांचे मार्गदर्शन व सहवास लाभला आणी यातूनच हे व्यक्तिमत्व घडून आज ते कामगार चळवळीत देश पातळीवर पोहचले आहेत खऱ्या अर्थांने ही बाब खामगाव वासियासाठी अभिमानास्पद आहे अत्यंत मनमिळाऊ व मृदू स्वभाव मात्र वेळ प्रसंगी तितकाच कठोर असलेला हा माणूस निस्वार्थ पणे कामगारांसाठी लढतो आहे.
कोण म्हणते पृथ्वी उभी आहे नागाच्या फण्यावर। ती तर उभी आहे मित्रांनो कामगारांचे हातावर या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनि लिहलेल्या काव्या तुन प्रेरणा घेऊन कामगार हा केंद्रबिंदू मानून सी एन देशमुख कार्यरत आहेत या त्यांच्या चळवळीला यश मिळून कामगार वर्गाला न्याय मिळावा व तो मिळत राहील अशी सर्व सी एन यांचे प्रेमी जणांना खात्री आहे.
माझे वर्ग मित्र असल्याने मी त्यांना जवळून ओळखतो परिस्थिती नुसार शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही तरी शिक्षणाची कास न सोडता त्यांनी नौकरी करून एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले व समाजा समोर एक आदर्श प्रास्थपित केला. लहान पणा पासून कर्मठ राहून सी एन देशमुख यांनी समाजाची कामगारांची खऱ्या अर्थाने सेवा केली. त्यांना मिळालेल्या खामगाव रत्न पुरस्कारा बद्धल माझ्या प्रिय मित्राचे अंतरंगातून अभिनंदन व पुढील वाटचालीस भरभरून शूभेच्छा—गजानन कुलकर्णी (जेष्ठ पत्रकार)