गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा आणि एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायफर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान गाजलेला असताना या आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. असे अनेक प्रकार अहेरी आगारात घडत असतानाही राज्य सरकार मात्र या आगाराला नवीन बस गड्यात पुरवण्यात दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असल्या तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र आहे…