न्यूज डेस्क : ‘आदिपुरुष’ हा बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हापासून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत्र आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत जनभावना लक्षात घेऊन चित्रपटाचे संवाद बदलण्याचे आश्वासन मनोज मुंतशीर आणि आदिपुरुषचे निर्माते-दिग्दर्शक यांनी दिले आहे. चित्रपटाशी संबंधित लोकांच्या मते, ‘आदिपुरुष’ला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मात्र भारतात या चित्रपटाची खिल्ली उडविली जात असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
हा चित्रपट एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव बनवून, लोक आणि प्रेक्षकांचे इनपुट लक्षात घेऊन चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय टीमने घेतला. आता निर्माते त्या संवादांचा पुनर्विचार करत आहेत, हे सुनिश्चित करून की ते पुढील काही दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार्या चित्रपटाच्या मूळ साराशी प्रतिध्वनित होईल. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन असूनही टीम कटिबद्ध असल्याची साक्ष हा निर्णय आहे. तर बदलणारे संवाद खाली प्रमाणे आहेत.
इंद्रजीतच्या या डायलॉगवर बजरंग बली म्हणतो, “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की”
अशोक वाटिकेत जेव्हा बजरंग बली सीतेला भेटण्यासाठी येतो, तेव्हा रावणाचा एक राक्षस त्याला पाहून म्हणतो, “तेरी बुआ का बगीचा है क्या, जो हवा खाने आ गया”
या चित्रपटात बजरंग बलीच्या तोंडी असलेला आणखी एक डायलॉग म्हणजे, “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे”
युद्धादरम्यान लक्ष्मणावर जेव्हा इंद्रजीत वार करतो, तेव्हा म्हणतो, “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है”
अशोक वाटिकेत सीतेची भेट घेतल्यानंतर जेव्हा बजरंग बली श्रीरामाकडे परततो, तेव्हा ते सीतेविषयी विचारतात. “जानकी कैसी है”, असा प्रश्न विचारल्यावर बजरंग बली म्हणतो, “जीवित है”
आदिपुरुष चित्रपटाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्या प्रेक्षकांच्या भावना आणि सदिच्छा यांच्या पलीकडे काहीही नाही. त्याचवेळी, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दिल्ली युनिटने ‘वादग्रस्त’ दृश्ये आणि संवादांचे पुन्हा पुनरावलोकन होईपर्यंत ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यासह इतर पक्षांनीही चित्रपट निर्माता ओम राऊत यांच्यावर चित्रपटातील भगवान हनुमानाच्या प्रतिपादनामुळे लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल टीका केली.
तर चित्रपटाचे लेखन, पटकथा,संवाद, लिहणारे मनोज मुन्तजीर यांनी सोशल मिडियावर भली मोठी पोस्ट टाकून ट्रोल करणार्यांना सौम्य भाषेत सुनावलं आहे. काय म्हणाले मनोज मुन्त्जीर…
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…