Friday, October 18, 2024
Homeराज्यधम्म क्रांति परिषद अतिशय उत्साहात पार पडली...

धम्म क्रांति परिषद अतिशय उत्साहात पार पडली…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

डोंगरकिन्ही येथे धम्म क्रांति परिषद अतिशय उत्साहात पार पडली या धम्म परिषद ला सकाळी आठ वाजता धम्म राॅली पासुन सुरवार करण्यात आली नंतर 12 ते 4 भिक्खु संघाकडुन धम्मप्रवचन /धम्मदेसना देण्यात आली नंतर सर्व उपस्थितांना भोजन दान देण्यात आले.

सायंकाळी ठिक 6 वाजता विविध मान्यवरांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले कवी गायक प्रज्ञानंद भगत समाज रत्न , भाई कैलाश सुखदाने संघर्ष योद्धा ,किशोरदादा गवई संघर्ष नायक, समाधान गायकवाड़ धम्मरत्न, आरती इंगळे यांना रमाई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सह विविध विषयावर मा कैलास भाई सुखदाने जे एस शिंदे साहेब मा दे वा इंगळे, बबनराव बंसोड यांणी मार्गदर्शन केले तर विनोद भाऊ अंभोरे यांणी आपले मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले तर अपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पंचशील मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले नंतर 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जंगि बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचशील मित्र मंडळाने व भिमशक्ती मित्र मंडळ यांच्या सह सर्व समाज बांधवांनी अतिशय परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विषेश योगदान मा शाहिर संजय ईंगळे यांणी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: