मूर्तिजापूर (जिल्हा अकोला)- प्रफुल्ल शेवाळे
गौरी, गणपती गणेशोत्सव सणा निमित्त मूर्तिजापूर तालुक्यातील महिला वर्ग व तरुणीनींकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मूर्तिजापूर शहरात करण्यात आले होते . अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष चे उपाध्यक्ष ऍड. शेखर वाकोडे यांनी सदर कार्यकर्माचे आयोजन केले होते . या कार्यक्रमासाठी स्टार प्रवाह वाहिनी वरील प्रसिद्ध मालिका फुलाला सुगंध मातीचा मधील किर्ती म्हणजे अभिनेत्री समृद्धी केळकर हिने हजेरी लावून उपस्थित महिला भगिनी आणि तरुणी यांच्या उत्सहात एक प्रकारची भर टाकली असल्याचे चित्र यावेळी दिसत होते.अनेक महिलांना, तरुणी वर्गाला अभिनेता समृद्धी केळकर सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.महिला वर्गाचा लाडका पैठणीचा खेळ आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि त्याच बरोबर भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी या निमित्ताने शेकडो महिला आणि तरुणी या कार्यक्रमा साठी उपस्थित होत्या.
अनेक शेतकरी, गरजू महिलांना बक्षिसे जिंकण्याची संधी यावेळी मिळाली.या कार्यक्रमा मुळे उपस्थित महिला भगिनीं अगदीच खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय उत्साही आणि तल्लीन झाल्याचे चित्र दिसून येते.. त्यात अभिनेत्री समृद्धी केळकर च्या उपस्थितीने महिला भगिनी विविध होम मिनिस्टर खेळ आणि पैठणीच्या खेळात रंगून गेल्या होत्या. वर्षभरात निदान एक दोन असे कार्यक्रम साजरे होणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांना आपल्या नित्य दिनचर्या मधून थोडी फार उसंत मिळेल असं मत उपस्थित महिला वर्गाकडून दिसून येते होत. यावेळी प्रसिद्ध रेडिओ जॉकी श्री ने सूत्रसंचालन आणि महिलांच्या विविध खेळ रचून कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली होती.सदर कार्यक्रम दि.१३ सप्टेंबर रोजी भगवंत लॉन, गोयंका नगर, मूर्तिजापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता..सांस्कृतिक कार्यक्रमा मधून महिला भगिनींचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळते असं राष्ट्रवादी काँग्रेस अकोला जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी म्हटलं आहे..
या कार्यक्रमा साठी भैय्या साहेब तिडके, (मा. आमदार), सौ. स्वाती ताई गावंडे महिला आघाडी , सौ. तेजस्विनी ताई बारबदे(प्रदेश प्रवक्ते ), सौ अमिता ताई तिडके, सौ. सुषमा ताई कावरे (महिला जिल्हाध्यक्ष अकोला ), सौ. सविताताई अडसूळ (जिल्हा उपाध्यक्ष- अकोला),सौ. रंजना ताई सदार (महिला तालुकाध्यक्ष, मूर्तिजापूर)सौ. दिपालीताई देशमुख (महिला शहर अध्यक्ष, मूर्तिजापूर), सौ. संगीता ताई दाळू (महिला तालुकाध्यक्ष, अकोला),सौ. राजश्रीताई खडसे (महिला सचिव, मूर्तिजापूर तालुका ),सौ. मीना ताई घुमसे (महिला तालुकाध्यक्ष, बार्शिवटाकळी ), सौ. ताजबी शेख हुसेन (महिला शहर अध्यक्ष, बार्शिटाकळी ) याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या अकोला जिल्हा आणि मूर्तिजापूर तालुका कार्यकारिणी मधील विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या..