Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीकरजगाव येथील वृध्दाचा खुन करुन चोरी करणारे गुन्हेगार अवघ्या चार दिवसात स्थानिक...

करजगाव येथील वृध्दाचा खुन करुन चोरी करणारे गुन्हेगार अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण सह पोस्टे बेनोडा येथील पोलीसांनी केले जेरबंद…

अमरावती ग्रामीण घटकातील पोलीस स्टेशन बेनोडा अतर्गत येणा-या करजगाव येथे दिनांक १३/०२/२०२३ रोजी रात्री ११/३० वा चे सुमारास अढाउ नामक वृध्द दांपत्य घरात झोपेत असतांना अज्ञात चोरटयानी घरालगतच्या शेतातून घरात प्रवेश करुन झोपेत असलेल्या दांपत्यापैकी वृध्द महीला सुलोचना शंकरराव अढाउ वय ८२ वर्ष हीचे गळयातील व कानातील ५ ग्रॅम चे सोन्याचे दागिने जबरीने काढुन घेत असतांना वृध्द शंकरराव सखाराम अढाउ वय ८४ वर्ष यांनी चोरटयांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांनी शंकरराव अढाउ यांचे तोंडावर ठोस वस्तुने वार करुन खुन केला.

सदर घटनेबाबत फिर्यादी सुलोचना शंकरराव अढाउ वय ८२ वर्ष रा करजगाव यांचे फिर्याद वरुन पोस्टे बेनोडा येथे गुन्हा रजि. क्रं ३६ / २०२३ कलम ३०२,३९४ भादवी चा गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला असताना घटनेचे गांभीय लक्षात घेवुन घटनास्थळी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र श्री. जयंत नाईकनवरे मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. शशीकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी मोशी डॉ.श्री निलेश पांडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री तपन कोल्हे यांनी त्याचे पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देवुन गुन्हा उघडकिस आणण्याकरीता पोस्टे बेनोडा येथील अधिकारी अंमलदारासह प्रयत्न सुरु केला.

सदर घटनेचे बारकाईने विश्लेषण करुन वेगवेगळया दृष्टीकोनातुन आरोपीतांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनिय माहीतीसह तांत्रिक पुरव्याच्या आधारावरुन सदर गुन्हा अजय किसनराव ब्राम्हणे वय ३८ वर्ष रा करजगाव ता. वरुड जि अमरावती याने त्याचा सहकारी नामे शाहरुख उर्फ मुस्ताक शहा वय ५१ वर्ष रा. जरुड ता.वरुड यांनी केला असल्याचा संशय बळावल्यावरुन नमुद आरोपींना दि.१७/०२/२०२३ रोजी अतिशय शिताफिने पोलीस स्टेशन बेनोडा येथील पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवुन घटनेबाबत
सखोल विचारपुस केली असता सदरचा गुन्हा नमुद आरोपींनी केल्याची कबुली दिली.

आरोपी अजय किसनराव ब्राम्हणे यास वृध्द दांपत्याबाबत संपुर्ण माहीती असुन नमुद आरोपी कर्जबाजारी असल्याने वृध्द दांपत्याकडुन सोन्याचे दागिने तसेच पैसे मिळवण्याकरीता त्याने सहकारीच्या मदतीने जबरी चोरी करीत असताना वृध्दाने प्रतिकार केल्याने त्याचे डोक्यावर केलेल्या हल्यात सदर वृध्द मृत झाल्याचे लक्षात आल्याने नमुद आरोपीतांनी घाबरुन तेथुन पळ काढला असल्याचे सांगितले.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी डॉ. श्री. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे, यांचे नेतृत्वात बेनोडा ठाणेदार श्री.स्वप्नील ठाकरे, सपोनि रामेश्वर धोंडगे, पोउपनि नितीन चुलपार,पोउपनि गणपत पुप्पुलवार, अंमलदार संतोष मुदांने, दिपक उईके, रविद्र बावणे, बळवंत दाभणे, युवराज मानमाठे, रविद्र व-हाडे, स्वप्नील तवर, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, सागर नाठे, कमलेश पाचपोर, हर्षद घुसे, संदीप नेवारे, तसेच पोस्टे बेनोडा येथील अंमलदारासह सायबर सेल चे सागर धापड, चेतन गुल्हाने, सरिता चौधरी, रितेश वानखडे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: