बाळापुर – सुधीर कुमार कांबेकर
बाळापूर तालुक्यातील कारंजा रम. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या खोलीचे बांधकाम चालूआहे. सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. शाळेचा स्लॅब टाकल्यानंतर केवळ दहा दिवसात तो कोसळला. तसेच खोलीचे कॉलम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामामध्ये सिमेंटची मात्रा कमी वापरली आहे.
त्यामुळे हे बांधकाम पाडून नवीन दर्जेदार बांधकामकरावे, असे निवेदन २७ डिसेंबरला शळा व्यवस्थापनसमिती व ग्रामस्थांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला यांना दिले.या निवेदनावर विलास तायडे,रुपाली काळे, पुरुषोत्तम उंबरकर,अशोक तायडे, साधना तायडे, यशोदा धबाले, नम्रता नागे, दिनेश दामोदर,श्रीराम भानोसे, गणेश दामोदर,ज्ञानेश्वर तायडे, संतोष पवार, विद्ठल काळे, राजू पांडव, आर.एस. पांडव, नीलेश भानोसे,संतोष हागे, किसन राऊत, गणेश शेगोकार, शाळेचे मुख्याध्यापक मनोहर चोथे यांच्यासह बहुसंख्य पालक, ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत