न्युज डेस्क – गेल्या 25 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या जितापूर ते शेलू बोंडे मधील रस्त्याची चाळणी झाली असून पायदळ चालणाऱ्यालाही व्यवस्थित चालत येत नाही. त्यामुळे बरेच नागरिक पर्यायी रस्त्याचा वापर करतात. पण काही गावांना पर्यायी मार्ग नसल्याने मजबुरीने याच मार्गाचा अवलंब करतात.
मागील वर्षी मोठा गाजावाजा करीत रुंदीकरण व दुरुस्तीकरणाचे फलक लावून दिले आणि काही ठिकाणी थातूर मातूर डागडुजी करून घेतली आणि रोड जैसे थे. गेल्या अनेक दिवसांपासून या रोडवरील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत मात्र संबंधित बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तर याच रस्त्यावर जितापूर नाकट येथे पुलाचे बांधकाम करण्यात आलं मात्र मागील वर्षी आलेल्या पावसाने ते बांधकाम वाहून गेलं. याच रस्त्यावरील येणाऱ्या गावातील मुलं-मुली दररोज शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे ये-जा करतात. जो त्रास त्यांना येण्या जाण्यासाठी विद्यार्थाना सोसावा लागतो तो त्यांनाच ठाऊक.
एखादा रुग्णाला या रस्त्याने घेऊन तेही कठीण काम आहे गेल्या अनेक वर्षात कितीतरी बळी या रस्त्याने घेतले आहे. मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या फलकावर असलेल्या माहिती प्रमाणे हा रोड केव्हा होईल, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना कधी सुखकर प्रवास करता येईल?