Sunday, November 3, 2024
Homeराज्यदेवलापार अप्पर तहसिलच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा, बांधकाम मंजुरी व ९...

देवलापार अप्पर तहसिलच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा, बांधकाम मंजुरी व ९ कोटी रु.च्या निधीला प्रशासकीय मान्यता…

आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश

रामटेक – राजु कापसे

दि.१४ रामटेक तालुक्यातील देवलापार येथे अप्पर तहसिल कार्यालय असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग, रामटेकच्या अंतर्गत विश्राम गृह सुरु आहे. त्याठिकाणी प्रशासकीय कामकाजाकरिता जागा अपूरी पडत असल्याने विश्राम गृहालगत असलेल्या महसूल विभागाच्या जागेवर नवीन इमारत बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

अप्पर तहसिल कार्यालय,देवलापार च्या प्रशासकीय इमारत बांधकामाकरीता निधी मंजूर करण्याबाबतचे पत्र आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले व त्याबाबत वारंवार पाठपुरावा देखील केला.

त्यानुसार महसूल विभागाने दि.२३ फेब्रुवारी २०२४ ला शासन निर्णय काढून अप्पर तहसिल कार्यालय, देवलापारची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी रु.९ कोटीची मान्यता देण्यात आली आहे. आणि लवकरच कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण करण्यात येईल.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: